अजित पवार 5 दिवसांमध्ये पुन्हा कामाला लागतील : राजेश टोपे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांना कोरोनाची लागण ( positive for COVID-19) झाली असून ते ते मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांनी प्रकृती ठीक असल्याचे सांगितले असले तरीही राज्यात चर्चा सुरु आहेत. यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे (health minister Rajesh Tope) यांनी पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली. त्यांची प्रकृती उत्तम असून काळजीचे कारण नाही. ते पाच दिवसांत (will-resume-work-five-days) पुन्हा राज्याच्या सेवेत असतील, असे सांगितले.

उपमुख्यमंत्री पवार हे गेल्या काही दिवसांपासून होम आयसोलेशनमध्ये होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या होत्या. मात्र, आज त्यांनी यावर आज खुलासा करत कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट केले. पवारांना अंगदुखी, ताप सारखी लक्षणे जाणवत होती. त्यांनी त्यावेळच्या बैठकांमध्ये जवळच्या व्यक्तींनाही लांब राहण्यास सांगितले होते. सुप्रिया सुळेंनाही त्यांनी लांब थांबण्यास सांगितले होते. पवार हे शिस्तीचे असल्याने त्यांना सर्व गोष्टी नीट व्हाव्यात असे वाटत होते. यामुळे ते कोरोना काळात दौरे, बैठकांचे सत्र करत होते. मात्र, काळजी घेऊनही त्यांना कोरोनाची लागण झाली. कोरोना झाल्यानंतर विश्रांतीची गरज असते. यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते विश्रांती घेत आहेत. त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवल्याने आयसोलेट झाले. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. डॉक्टरांच्या सल्ल्याचे ते पालन करत आहेत, असे टोपे यांनी सांगितले.

You might also like