Ajit Pawar | ‘…तर 100 टक्के क्षमतेने नाट्यगृहे आणि चित्रपटगृहांना परवानगी देणार’ – अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | राज्य सरकारने (Maharashtra Government) राज्यभरातील नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे सुरू करण्यास आज म्हणजेच शुक्रवारपासून परवानगी दिली आहे. मात्र, कोरोनाचे नियम पाळून पन्नास टक्केच्या क्षमतेने ही परवानगी देण्यात आलीय. दरम्यान या पार्श्वभुमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे आज अजित पवार यांच्या हस्ते ‘तिसरी घंटा’ वाजवून नाट्यगृहाची नांदी झाली. त्यावेळी ते बोलत होते.

 

त्यावेळी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, राज्यातील नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे 100 टक्के क्षमतेने सुरू करण्याची मागणी होत आहे, दिवाळीच्या नंतर परिस्थिती अशीच राहिली आणि आणखी चांगली झाली तर संपूर्ण क्षमतेने नाट्यगृहे आणि चित्रपटगृहांना आम्ही परवानगी देणार आहोत, अशा शब्दांत त्यांनी चित्रपटगृह चालकांना एक दिलासा देण्याचं काम केलं आहे. आज राज्यासह पुण्यातील नाट्यगृह शुक्रवारपासून रसिकांसाठी सुरु झाली आहेत.

 

अजित पवार म्हणाले, नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि सगळ्यांनी चर्चा झाली. एकपडदा चित्रपटगृह चालकांचेही काही प्रश्न आहेत. त्यातही मी लक्ष घातलेले आहे. मुख्यमंत्र्यांनीही आपण त्यातून मार्ग काढून देऊ असा सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आपली जी नाटकांची परंपरा आहे ती पुण्यात किंवा संपूर्ण महाराष्ट्रात असेल या सगळ्या गोष्टींना अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न करू, असं देखील पवार (Ajit Pawar) म्हणाले.

दरम्यान, बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करायचा म्हटले तर त्यामध्ये दोन मतप्रवाह आहेत.
कुठलाही निर्णय घेत असताना तो शंभर टक्के सगळ्यांना आवडेल असा दावा कदापि करणार नाही.
आधीच सतरा महिने नाटयगृह बंद होती. त्यात आता बालगंधर्व रंगमंदिर नूतनीकरणासाठी पाडले किंवा बंद ठेवावे लागले
आणि पुन्हा दुसरे कुठले कामच करता आले नाही तर कलाकार अडचणीत सापडतील.
तर, सभागृहे किंवा नाट्यगृहांचे बांधकाम करताना कलाकारांचा विचार व्हायला हवा. मी महापौर मुरलीधर मोहोळ आणि आयुक्तांना तशा सूचना देईन, असंही ते म्हणाले.

 

Web Title :- Ajit Pawar | will theaters and cinemas state start operating 100 cent capacity

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Corona | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 93 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Modi Government | सरकारी बँकेत अकाऊंट आहे? मग ‘या’ योजनेचा घ्या लाभ; दरमहा 28 रुपये जमा करून 4 लाख मिळणार, जाणून घ्या

Koregaon Bhima Violence Case | IPS अधिकारी परामबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्याचे कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे आदेश