home page top 1

‘कोसळ’धार पावसात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘फार्म हाऊस’ला भीषण आग !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घोटावडे येथील फार्म हाऊसला आग लागली आहे. ही आग आज (रविवार) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास लागली असून यामध्ये कोणतीही जीवीत हानी झाली नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

Ajit-Pawar-farm-house

पुण्यापासून काही अंतरावर मुळा नदीच्या तीरावर अजित पवार यांचे फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसवरून वाद निर्माण झाले होते. हे वाद न्यायालयात पोहचले होते. फार्म हाऊसला कशामुळे आग लागली हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, धुराचे लोट बाहेर पडत असल्यान परिसरात धुराचे साम्राज्य पसरले आहे. या घनटेची माहीती अग्निशमन दलाला देण्यात आली आहे.

 farm house

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहे. स्थानिकांकडून पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, आग मोठ्या प्रमाणात लागली असून या अगित कोणीही जखमी झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like