‘2 दोन दिवसांपूर्वीच अजित पवारांचा फोन आला होता’, विधानसभा अध्यक्षांचा खुलासा

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – अजित पवार यांनी माझ्या पीए सागर यांच्याकडे राजीनामा देत फोन करून मला राजीनामा दिल्याचे सांगितले असा खुलासा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केला. हरिभाऊ बागडे म्हणाले, “2 दिवसांपूर्वी अजित पवारांनी मला फोन करून विचारले नाना कुठे आहात ? मी औरंगाबादला आहे असं मी सांगितलं. तेव्हा कळालं नाही की, ते राजीनामा देणार होते. आज अचानक मुंबईच्या विधीमंडळातील माझ्या कार्यालयात ते आले माझे पीए सागर यांच्याकडे त्यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिलेला राजीनामा त्यांनी सादर केला आणि तेथूनच मला फोन करून राजीनामा दिल्याचे सांगितले.” असे त्यांनी स्पष्ट केले.

हरिभाऊ बागडे म्हणाले, “अजित पवार माझे चांगले मित्र आहेत. त्यामुळे मी त्यांना मैत्रीच्या भाषेतच राजीनामा देण्याचे कारण विचारले. नाना नंतर सांगतो माझा राजीनामा तात्काळ मंजूर करा असे ते म्हणाले. माज्या कार्यालयात सायंकाळी 5.40 वाजता पवारांनी राजीनामा दिला. त्यानंतर त्यांचा फोन आल्यानंतर आम्ही तो मंजूर केला.” असे बागडेंनी सांगितले. याशिवाय राजीनामा पत्रातही केवळ इतकेच लिहिले होते की, “मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. तो मंजूर करण्यात यावा.” बागडेंनी त्यांनी स्पष्ट केले.

मेलवर राजीनामा स्विकारण्याची सुविधा
हरिभाऊ बागडे यांनी असेही सांगितले की, “राजीनामा देण्यासाठी मला भेटण्याची गरज नाही. माझ्या मेलवर राजीनामा दिल्यास तो मंजूर केला जाईल. आठवड्याभरापूर्वीच तशी सुविधा केली आहे. त्यानुसार आतापर्यंत 3 आमदारांनी मेलवर राजीनामे दिले आहेत. ते मंजुर केले आहेत.”

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like