अजित पवारांची पत्रकार परिषद : सांगितलं राजीनाम्याचं कारण, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य शिखर बँकेच्या संदर्भात बोलताना अर्थमंत्र्यांनी विधीमंडळात सांगितलं की 1088 कोटी रूपयांच्या कर्ज वाटप प्रकरणात अनिमीतता झाली आहे. मग 25 हजार रूपये कोटीचा घोटाळा झाला असे म्हणणं चुकीच आहे असे अजित पवार यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत सांगितलं. शरद पवार हे शिखर बँकेचे संचालक नव्हते. असे असताना देखील त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला. त्याचा मला प्रचंड त्रास झाला आणि त्यातून मी आमदारकीचा राजीनामा दिला. मी राजीनामा दिल्यानंतर सर्व नेत्यांना, कार्यकर्त्यांना वेदना झाल्या. यापुर्वी मी उप मुख्यमंत्री असताना देखील राजीनामा दिला होता. त्यावेळी देखील मी कोणाला सांगितले नव्हते. यावेळी माझ्याकडून ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यांची मी माफी मागतो असे अजित पवार म्हणाले. गेल्या 3 दिवसांपुर्वी मी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना फोन केल्याचे देखील पवारांनी सांगितले. शरद पवारांची बदनामी माझ्यामुळं झाली म्हणूनच आपण राजीनामा दिल्याचे अजित पवारांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सायंकाळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राजकीय वर्तूळामध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. शुक्रवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली. शरद पवार यांनी देखील अजित पवार यांनी राजीनामा देण्यापुर्वी तसेच दिल्यानंतर संपर्क केला नाही असे सांगितले. अजित पवार यांच्याशी भेट झाल्यानंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतील असे सांगितले. दरम्यान, शरद पवार यांनी माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याने अजित पवार अस्वस्थ झाले असून त्यांनी त्यातूनच राजीनामा दिला असावा असा अंदाज देखील शरद पवार यांनी व्यक्‍त केला.

पुणे दौरा अर्धवट सोडून शरद पवार मुंबईला गेले. शनिवारी सकाळपर्यंत अजित पवार नॉट रिचेबल होते. शरद पवार मुंबईला पोहचले. दरम्यान, अजित पवार यांनी शुक्रवारी रात्री उशिरा शरद पवारांना फोनवरून संपर्क केला. मुंबईत भेट घेण्याचे ठरले. अजित पवार शनिवारी मुंबईत पोहचले. शरद पवार यांच्या मुंबईतील घरी पवार कुटूंबियांची बैठक झाली. त्यावेळी खा. सुप्रिया सुळे, पार्थ पवार, अजित पवार यांचे भाऊ देखील उपस्थित होते. बैठक झाल्यानंतर शरद पवार यांनी ऑल इज वेल असल्याचे पत्रकारांना सांगितले. अजित पवार यांनी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान, अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.

पत्रकार परिषदेतील इतर महत्वाचे मुद्दे
1. शुक्रवारी शरद पवार हे ईडीच्या कार्यालयात जाणार होते. त्यावेळी मी गैरहजर होतो म्हणून काही जणांनी चुकीच्या बातम्या दिल्या. मात्र, त्यावेळी मी पुरामध्ये ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो.
2. कुटुंबात गृहकलह अजिबात नाही.
3. मुंबईत शुक्रवारी गैरहजर राहिल्याबद्दल दिलं स्पष्टीकरण
4. शरद पवारांचा शब्द माझ्यासाठी अंतिम
5. प्रदेशाध्याक्षकांनी तिकीट दिल्यास रोहित पवार निवडणूक लढवणार
6. शरद पवारांच्या सूचनेनंतरच मी पत्रकार परिषद घेतली.
7. अजित पवार झाले भावनिक, आम्ही पण माणसं आहोत

Visit : Policenama.com