दादा, तुम्ही DCM झालं पाहिजे, कार्यकर्त्यांच्या मागणीला अजित दादांनी दिले ‘हे’ उत्तर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. यानंतर राष्ट्रवादीचा पहिलाच कार्यकर्ता मेळावा आज पुण्यात झाला. पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित आमदारांचा अजित पवारांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला. अजित पवार या कार्यक्रमाला येणार असल्याने ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अजित पवार आल्यानंतर कार्यकर्त्यांनी दादा तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा अशी गळ घातली. त्यावेळी अजित पवारांनी संयमाने त्यांना शांत राहण्याचे सांगत तुमच्या भावना समजल्या असे म्हणाले.

कार्यक्रमादरम्यान त्यांनी डिसेंबर संपण्याआगोदर मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. राष्ट्रवादीला सरकारमध्ये 15 मंत्रिपदं धरून 17 पदं मिळालीत. यावेळी नवीन खाती घेण्याचा प्रयत्न आहे. विकासकामे मार्गी लावण्यासाठीच अर्थ खातं राष्ट्रवादीकडे ठेवलं. शहरांसाठी महत्त्वाचे गृहनिर्माण आपल्याकडे घेतलं आहे. सहकार खातं आपल्यासाठी महत्त्वाचं असल्यानेच हे खाते राष्ट्रवादीकडे घेतलं असल्याचे अजित पवारांनी सांगितले.

आयारामांना रेड कार्पेट नको
अजित पवार म्हणाले, आयारामांना लगेच रेड कार्पेट नकोच. उगवत्या सुर्यांला नमस्कार करणारे भरपूर जण पक्षात येण्याचा प्रयत्न करतील. पण सगळ्यांनाच तपासून घेणार आहोत. काही लोकं तिकडे गेल्यानं पक्षाचं ओझं कमी झाले आहे. साहेबांच्या सातारच्या सभेने हवा झाली. ईडीने वातावरण बदललं. फडणवीसांना मी पणाचा फटका बसला. तीनही पक्षांनी वाद टाळले तर पाच वर्षे सरकार चालेल असेही त्यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like