अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांची नागपूर अधिवेशनाला हजेरी 

नागपुर: पोलीसनामा ऑनलाइन
यंदा राज्याचे पावसाळी अधिवेशन कित्येक वर्षांनंतर प्रथमच नागपूर येथे होत आहे. नागपूर ला पावसाळी अधिवेशन घेण्यात येणार त्या घोषणेपासून आजअखेर अधिवेशन चर्चेत राहिले आहे. तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांनी अधिवेशनाला  हजेरी लावल्याचे पाहावयास मिळाले आहे.
[amazon_link asins=’0230363385′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’90ce7df4-8b26-11e8-89ba-83471a4ebb35′]
 दरवर्षी पावसाळी अधिवेशन मुंबई येथे घेण्यात येते. मात्र यंदा हे अधिवेशन नागपूर येथे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. हे अधिवेशन नागपूरला घेण्यावरून विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर सडकून टीका केली. तरी देखील सत्ताधारी भाजप ने नागपूर येथेच हे अधिवेशन घेतले. हे अधिवेशन निर्विघ्न  पार पडेल असे वाटत असताना. नागपूर येथे झालेल्या जोरदार पावसाचा फटका विधिमंडळ ठिकाणी देखील बसला. विधिमंडळाच्या परिसरात पाणी साचले, लाईट गेली. यामुळे विधिमंडळाचे कामकाज बंद पडले.
या सर्व घडामोडीवरून सताधारी पक्षाला चांगले टीकेला सामोरे जावे लागले. अखेर विधिमंडळाचे कामकाज सुरुळीत झाले आहे. तर मुंबई किंवा नागपूर येथील अधिवेशनाचे कामकाज पाहण्याची प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि वार्ताहरांना देखील उत्सुकता असते. यात लोकप्रतिनिधींच्या मुलांना देखील अधिक असते. हेच यंदा देखील पाहण्यास मिळाले.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9da6c312-8b26-11e8-9edb-dd1a35e809d8′]
शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य यांनी काल विधीमंडळास भेट दिली. तर त्याला काही तास होत नाही. तोवर आज अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांनी देखील विधी मंडळ ठिकाणी भेट दिली. ठाकरे आणि पवार या कुटूंबातील तिसरी पिढी राजकारणात सक्रिय होताना दिसत आहे. तर आदित्य ठाकरे आणि पार्थ पवार या दोघांच्या विधी मंडळ भेटीची सोशल मिडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.