अजित पवार यांनी शहरातील गणेश मंडळाच्या ‘श्रीं’चे घेतले दर्शन

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन
उद्योगनगरीचे तत्कालीन कारभारी आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक  कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर बुध्दीची देवता गणरायांच्या आरतीसाठी शनिवारचा दिवस पिंपरीत घालवला. दिवसभरात पवार यांनी अनेक मंडळांना भेटी देऊन गणरायांचे दर्शन घेतले. पवार यांच्या शहरात येण्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नवचैतन्य प्राप्त झाले आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जोमाने कामाला लागा, अशा सूचना देखील पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8531fda7-bf1e-11e8-8033-3b4990cee592′]

दरम्यान, दापोडी येथून दुपारी तीन वाजता पवार यांनी गणेश मंडळाच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर भोसरी, चिखली, चिंचवड, निगडी, आकुर्डीगाव, चिंचवडगाव, रहाटणी, पिंपळेसौदागर, वाकड परिसरातील गणेश मंडळांना पवार यांनी भेटी दिल्या. या वेळी राष्ट्रवादी काॅग्रेस चे पिपंरी चिचंवड शहराध्यक्ष मा. संजोग वाघेरे ( पाटील ) राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे, राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष श्री प्रशांत शितोळे माजी नगरसेवक, राष्ट्रीय खेळाडू शिवछत्रपत्री पुरस्कार विजेते शंकर काटे, नगरसेवक श्री डब्बु आसवाणी, नगरसेविका शीतल काटे, माजी नगरसेवक कैलास थोपटे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, विध्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे, पिंपळे सौदागर येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

दादांच्या बॉडीगार्ड्सची दादागिरी, महापौरांना धक्काबुक्की

महापालिकेने गेल्या दोन-तीन पंचवार्षिकीत अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविले आहे. परंतु, अलिकडच्या काळात पर्यावरणाचा –हास होत चालला आहे. प्रदुषण वाढले आहे. रोगराई पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गणराया सर्वांना निरोगी आरोग्य दे, असेही मागणे पवार यांनी बाप्पांकडे केले आहे.

पुण्यात ‘स्वाइन फ्लू’ने आतापर्यंत २० जणांचा मृत्यू,  रूग्णांची संख्या १०९ वर 

विधानसभा निवडणुकासाठी कामाला लागा
नगरसेवक नाना काटे यांच्या गणेश मंडळाच्या गणरायांची आरती देखील पवार यांनी केली. नाना काटे यांनी आवर्जून दादांना बोलावले होते. अजित पवार यांच्या पाठीमागे कार्यकर्त्यांचा ताफा होता. शहरातले अनेक प्रश्न त्यांच्या कानावर या वेळी टाकण्यात आले. आता आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. पक्षवाढीसाठी कसोशिने कामाला लागा, अशा सूचना पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांना दिल्या.

[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c688fa8e-bf1e-11e8-8d99-11f4369aa483′]