‘त्या’ राजकीय घडामोडींमुळे अजित पवारांचा दौरा रद्द

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा सोलापूर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींमुळे ऐनवेळी रद्द करण्यात आला. अजित पवार सिंचन विभागाच्या एका बड्या कंत्राटदाराकडील विवाहसोहळ्यानिमित्त सोमवारी सायंकाळी उपराजधानीत येणार होते. परंतु राजकीय घडामोडींमुळे त्यांनी त्यांचा हा दौरा रद्द केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल सोमवार ( दि.११ मार्च) पत्रकार परिषद घेत सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं होतं. इतकेच नाही तर, मावळ मतदारसंघातील पार्थ पवार यांच्या उमेदवार करणार असल्याचा मुद्दाही समोर आला होता. नव्या पिढीला संधी द्यावी हा हेतू आमचा आहे. त्यामुळे मावळमधून पार्थ पवारला उमेदवारी द्यावी असा आग्रह पक्षातून करण्यात आला आहे. असे काल शदर पवार यांनी सांगितले होते.

या आणि इतर काही राजकीय घडामोडींमुळे अजित पवार यांनी आपला दौरा रद्द केला. समोर आलेल्या माहितीनुसार, अजित पवार सायंकाळी नागपूरला येऊन ते रात्रीच्या विमानाने मुंबईला जाणार होते. मुख्य म्हणजे या दौऱ्यात कोणतीही बैठक किंवा राजकीय चर्चा नियोजित नव्हती हे विशेष.