वाट कशाची पाहता आता PoK वर ‘तिरंगा’ फडकवा, अजमेर शरीफच्या दिवानांनी सांगितलं

अजमेर : वृत्त संस्था – सूफी संत हजरत ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्तीचे वंशज आणि दीवाण सैयद जैनुल आबेदीन अली खान यांनी लष्कर प्रमुखांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. लष्कर प्रमुखांनी पीओकेवर दिलेल्या वक्तव्याचे समर्थन करताना ते म्हणाले, मग वाट कशाची बघताय.

दीवाण सैयद जैनुल आबेदीन अली खान म्हणाले की, भारतीय संसदेने लष्कराला आदेश दिला पाहिजे की एलओसीला भारतात सामावून घ्यावे. अजमेर दर्ग्याचे दीवाण म्हणाले, भारताच्या संसदेने 1994 मध्ये प्रस्ताव मंजूर करून स्पष्ट केले होते की, एलओसी भारताचा अभिन्न भाग आहे. मग आता ती वेळ आली आहे की भारताने आपला तो अभिन्न भाग परत घ्यावा. यासोबतच दीवाण सैयद जैनुल आबेदीन अली खान म्हणाले, काश्मीरला संपूर्ण काश्मीर बनवा, तसेच अखंड काश्मीरचे स्वप्नही पूर्ण करा. भारतासाठी तो ऐतिहासिक दिवस असेल ज्या दिवशी पीओके भारतात विलिन होईल, असे ते म्हणाले.

नवीन लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते की, पीओके भारताचा भाग आहे. सरकारने आदेश दिल्यास पीओकेवर कारवाई करू. संसदने पीओके हा भारताचा भाग असल्याचे मान्य केले आहे. संपूर्ण जम्मू काश्मीर भारताचा अभिन्न भाग आहे. लष्कर प्रमुखांनी म्हटले की, चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर एकाच वेळी नजर ठेवण्याची गरज आहे.

लष्कर प्रमुख म्हणाले, लष्कर बदलांच्या दिशेने पुढे निघाले आहे. बदलाच्या या प्रकियेत सर्वांना सोबत घेऊन जाणार आहोत. देशाची सीमा आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करणे हे भारतीय लष्कराचे कर्तव्य आहे. आमचे जवान आमची सर्वात मोठी ताकद आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/