अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी बढती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता असल्याने राज्याने केंद्राला यासंदर्भातील प्रस्ताव पाठवला होता. त्याला केंद्राने मंजूरी दिली. त्यामुळे त्यांची लवकरच नियुक्ती करण्यात येणार आहे. येत्या ३ दिवसांत ते पदभार स्विकारू शकतात.

याच वर्षी मार्च महिन्यात अर्थ विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाची जबाबदारी सांभाळणारे १९८३ च्या बॅचचे अधिकारी राज्याच्या मुख्य सचिवपदी युपीएस मदान यांची नियुक्ती मुख्य सचिव म्हणून करण्यात आली होती. ते याच वर्षी सप्टेंबर मध्ये निवृत्त होणार आहेत. मात्र तत्पूर्वीच मदान स्वेच्छानिवृत्ती घेणार असल्याची चर्चा आहे. किंवा त्यांना राज्य सरकारकडून महामंडळ किंवा आयोगाच्या संचालकपदी नियुक्ती केली जाईल अशी चर्चा आहे.

सर्वाधिक काळ मुंबई महापालिकेचे आयुक्त 

अजोय मेहता हे १९८४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. अजोय मेहता यांनी २०१५ मध्ये मुंबई महापालिकेचा पदभार स्विकारला होता. मुंबई महापालिकेचा कार्यभार सर्वाधिक काळ पाहणारे ते पहिले आयुक्त आहेत. त्यांनी यंदा चार वर्षे पुर्ण केली आहेत. यापुर्वी सदाशिव तिनईकर यांनी १९८६ ते १९९० या काळात सर्वाधिक काळ पदभार स्विकारला होता. त्यांनी ३ वर्षे ९ महिने ८ दिवस एवढ्या कालावधीत त्यांनी महापालिकेचा कारभार पाहिला होता. शिवसेनेच्या कारभारावर वचक ठेवण्यासाठी त्यांची नियुक्ती मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आल्याचा आरोप नेहमी केला जात होता.

You might also like