Ajwain Water 5 Benefits | वजन कमी करायचे असो किंवा अनियमित मासिक पाळीची समस्या असो, रोज प्या ओव्याचे पाणी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Ajwain Water 5 Benefits | ओव्याच्या पाण्याचे सेवन करून तुम्ही लठ्ठपणा कमी करण्यापासून अस्थमासारख्या गंभीर आजारापासून सुटका मिळवू शकता. सोबतच हे पाणी प्यायल्याने महिलांची अनियमित मासिकपाळीची समस्या सुद्धा दूर होते. ओव्याचे पाणी पिण्याचे फायदे (Ajwain Water 5 Benefits) जाणून घेवूयात.

1. अस्थमामध्ये उपयोगी
कफ साफ करण्यासह सर्दी-खोकल्यापासून सुटका होते. ओवा अस्थमा आणि ब्रोंकायटिस आजारात अतिशय उपयोगी आहे. यासाठी ओवा दिवसात दोन वेळा गुळासोबत सेवन करा. सर्दी-खोकल्यात उकळलेल्या पाण्यात ओवा टाकून सेवन करा.

2. अ‍ॅसिडिटीची समस्या
अ‍ॅसिडिटीची समस्या झाली असेल तर जिरे आणि आले पावडरसोबत याचे सेवन करून शकता. पोट फुगल्यास गरम पाण्यात ओवा टाका आणि लिंबू पिळून प्या.

3. अनियमित मासिक पाळी
अनियमित मासिक पाळीची समस्या असेल तर 200 मिलीलीटर पाण्यात एक चमचा ओवा आणि थोडा गुळ टाकून उकळवा आणि रोज सकाळी रिकाम्यापोटी सेवन करा.

4. किडनी आणि लिव्हरसाठी लाभदायक
अपचन, आतड्यांमध्ये वेदना, लीव्हर आणि किडनीची समस्या असेल तर ओवा रात्रभर पाण्यात भिजवा आणि सकाळी त्याचे सेवन करा.

5. वजन कमी करण्यात उपयोगी
ओव्याचे पाणी सेवन केल्याने शरीरातील फॅट कमी करण्यात मदत होते. वजन कमी होते. रोज सकाळी एक चमचा ओव्याचे सेवन करा.

Web Titel :- Ajwain Water 5 Benefits | whether there problem weight loss or irregular periods drink ajwain water daily

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Price Update | सोन्याच्या किमतीत घसरणीने खरेदीदार खुश ! आता 27501 रुपयात मिळतंय 10 ग्रॅम Gold, जाणून घ्या नवीन दर

T20-ODI Captaincy | T20 विश्वचषकानंतर विराट कोहली सोडणार कर्णधारपद, रोहित शर्मा सांभाळणार भारतीय संघाची सूत्रे – रिपोर्ट

High Security Number Plate | कामाची गोष्ट ! तुमच्या वाहनावर नसेल ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’, तर ‘या’ 11 कामांमध्ये येईल अडथळा; जाणून घ्या