Video : हरियाणवी नंतर आता पंजाबी गाण्यांवरही ‘डान्सर’ सपना चौधरीचे ‘ठुमके’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सपना चौधरीने हरियाणवी डान्सर म्हणून आपल्या करियरला सुरवात केली होती. त्या डान्समुळे तिला अशी प्रसिद्धी मिळाली की, तिला रिएलिटी शो ‘बिग बॉस’ मध्ये बोलवले होते. या शो मध्ये स्पर्धक म्हणून आल्यानंतर सपनाला प्रसिद्धी मिळाली. यानंतर तिला अनेक म्युजिक व्हिडीओज आणि चित्रपटाचे ऑफर यायला लागले. या सर्व गोष्टींमुळे तीने स्टेज वर परफॉर्म करणे नाही सोडले. या दिवसांमध्ये सपनाचे स्टेज परफॉर्मेंसचे व्हिडीओ समोर येताच असतात. परंतु नुकताच सपनाचा एक असा डान्स व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्या मध्ये ती स्टेजवर डान्स करत नाहीये. आणि एवढेच नव्हे तर सपनाचा हा डान्स आत्तापर्यतचा उत्तम डान्स आहे.

हरियाणवी गाण्यावर जबरदस्त ठुमके लावणारी सपना चौधरी यावेळी वेगळ्या अंदाजात पंजाबी गाण्यावर चाहत्यांचे होश उडवतांना दिसते आहे. नुकताच सपनाने आपल्या इंस्टाग्रामवर आपला व्हिडीओ ‘अख दा निशाना’ च्या बद्दल एक पोस्ट शेयर केली होती. त्यानंतर प्रेक्षकांना या व्हिडीओची खूप उत्सुकता लागली. आगामी पंजाबी चित्रपट ‘DSP DEV’ मध्ये सपना चौधरीचा डान्स बघायला मिळेल. त्या डान्सची अनाउंसमेंट नुकतीच सपनाने आपल्या इंस्टाग्रामवर केली आहे. आणि तो चित्रपट ५ जुलै ला प्रदर्शित होणार आहे. हे सपनाचे दुसरे पंजाबी गाणे आहे.

आरोग्यविषयक वृत्त – 

पाणी पिण्याबाबत आहेत अनेक गैरसमज, जाणून घ्या सत्य 

निरोगी आरोग्य जगण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश 

चवीने खाल्ले जाणारे मैद्याचे पदार्थ आरोग्यासाठी ‘घातक’ 

सावधान ! मधुमेहाच्या रूग्णांचे शुगरफ्रीमुळे वाढू शकते वजन