Akhil Bharatiya Marathi Chitrapat Mahamandal | अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी पहिली उमेदवारी घोषित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या (Akhil Bharatiya Marathi Chitrapat Mahamandal) निवडणूकीचा कार्यक्रम धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून येत्या मंगळवारी जाहीर होणार आहे. दोन गटात होणारे आरोप प्रत्यारोप गेली ७ वर्षे होत असून अजूनही त्याच आरोप प्र्त्यारोपांवर हि निवडणूक लढविली जाते कि काय ? अशी शक्यता दिसत असताना कला प्रसिद्धी विभागातून पुण्यातील पत्रकार आणि सलाम पुणे या संस्थेचे अध्यक्ष शरद लोणकर (Sharad Lonkar) यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. (Akhil Bharatiya Marathi Chitrapat Mahamandal)

 

याच सोबत त्यांनी आपणाला संक्षिप्त जाहीरनामाही आज माध्यमांना पाठविला आहे. यात दिलेल्या विशेष बाबी- मराठी सिनेसृष्टी (Marathi Cinema Industry) आणि सिंगल स्क्रीन थियेटर (Single Screen Theatre) सह एक्स्ट्रा आर्टिस्ट, तंत्रज्ञ यांना गतवैभव -सुवर्ण काळ लाभावा यासाठी अनेक योजना-प्रकल्प राबविण्याची गरज आहे, त्या आपण सादर करून त्याचा पाठपुरावा करणार. ज्यामुळे थियेटर आणि मराठी सिनमापासून दूर चाललेला रसिक पुन्हा उत्सुकतेने गर्दी करू लागेल. आणि एकूणच या व्यवसायातील प्रत्येकाला प्रतिष्ठा, वैभव लाभू शकेल.

 

या क्षेत्रात पैसा लावणाऱ्या निर्मात्यापासून ते गरीब तंत्रज्ञा पर्यंत अनेकांची आर्थिक पिळवणूक होते.
कोणाला व्यसनाधीन करून तर कोणाला आमिषे दाखवून लुटले जाते.
प्रसिद्धी आणि मार्केटिंगच्या नावाखाली होणाऱ्या अमाप फसवणुकीला पायबंद घालणे.

मुंबई (Mumbai), कोल्हापूर (Kolhapur), पुणे (Pune) या सारख्या ठिकाणी ज्यांची ऐपत नाही
अशा सिनेसृष्टीतील गोरगरीब तंत्रज्ञ ,एक्स्ट्रा आर्टिस्ट यांच्यासाठी शासकीय मदतीने स्वस्तात गृहप्रकल्पांची उभारणी करणे.

मुंबईतील फिल्म सिटी (Mumbai Film City) मध्ये महाराष्ट्रातून कामासाठी येणाऱ्या प्रत्येक फिल्मी
कलावंत-कामगारासाठी किमान ४०० जण राहू शकतील असे अत्यल्प दरात वसतिगृह उभारणे.

 

Web Title :- Akhil Bharatiya Marathi Chitrapat Mahamandal | First candidature announced for All India Marathi Film Corporation election

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

IND vs ENG | भारताच्या दीप्ती शर्माने चेंडू न टाकताच घेतली विकेट

CM Eknath Shinde | ते बंड फसले कारण त्यावेळी अजित पवार होते, यावेळी…, एकनाथ शिंदे यांनी सांगितला फरक

Ashish Shelar | भाजपाच्या शेलारांचा शिवसेनेला सवाल, पाकिस्तान झिंदाबादचा निषेधही करत नाहीत; कुठल्या बिळात बसलात?