साहित्य संमेलनाचे उद्घाटन आता आत्महत्या केलेल्या शेतकरी पत्नीच्या हस्ते 

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसापासून साहित्य विश्वात वेगवान घडामोडी घडत असल्याचे पाहण्यास मिळते आहे. कोणतेच साहित्य संमेलन वाद विरहित नकरण्याचा विडाच साहित्य क्षेत्रातील कारभाऱ्याने उचलला आहे. अशातच काही तरी चांगले काम केले म्हणण्यास पात्र ठरलेल्या या साहित्यवाल्या मंडळींनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे  उद्घाटन आत्महत्या केलेल्या शेतकरी पत्नीच्या हस्ते करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यवतमाळ हा राज्यातील सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या केलेला जिल्हा म्हणून शासन दरबारी नोंद आहे. म्हणून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले हे संमेलन रद्द करण्यात यावे आणि याचा सर्व निधी आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाना देण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती.

या मागणीला साजेसा निर्णय आता साहित्य महामंडळ आणि आयोजकांच्या वतीने घेण्यात आला आहे. या निर्णयावर आज गुरुवारी अंतिम निर्णय घेण्यात येणार असून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कर्तृत्ववान पत्नीच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

कोणताच साहित्यिक उद्घाटक म्हणून आमंत्रण स्विकारायला तयार नाही

साहित्य संमलेनात वाद निर्माण झाल्यामुळे आणि वादाला राजकीय वळण लागल्याने आयोजक आणि महामंडळाच्या सदस्यांचे आमंत्रण स्वीकारायला कोणताच साहित्यिक तयार नसल्याने आयोजकांची पाचावर धारण बसली आहे. अशातच ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार, कवी विठ्ठल वाघ आणि सुरेश द्वादशीवर या मोठ्या साहित्यिकांनी उद्घाटक म्हणून येण्यास नकार दिल्याने आता मोठ्या नामुष्की नंतर साहित्य महामंडळाने एका आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते या साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्याचे ठरवले आहे.

म्हणून उद्घाटक म्हणून सेहगल यांचे निमंत्रण केले रद्द 

यवतमाळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाला साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका नयनतारा सहगल यांना निमंत्रण देण्यात आले होते. तसेच या संमेलनाच्या उद्घाटक म्हणून हि त्यांना जाहीर करण्यात आले होते. न्याय हक्क आंदोलन समितीच्या वतीने देवानंद पवार यांनी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून नयनतारा सहगल यांच्या आमंत्रणाला आणि  उद्घाटक बनवण्याच्या कृतीला विरोध केला होता. त्याच प्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक पधाधिकाऱ्यांनी इंग्रजी लेखिकेला मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला कशाला बोलवायचे असा सवाल करत नयनतारा सहगल यांच्या निमंत्रणाला विरोध केला होता. या विरोधा नंतर नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यात आले होते. त्यानंतर हि मोठा वाद उफाळला, अनेक निमंत्रित साहित्यिकांनी आपण संमेनाला जाणार नसल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्र्यांना हि प्रसिद्धी पत्राद्वारे या प्रकारात आपला सहभाग नसल्याचे सांगावे लागले. म्हणून हे संमेलन चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले.