चंद्रलेखा नाट्यसंस्थेचे व्यवस्थापक रमेश मोरे यांचे निधन

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेचे उपाध्यक्ष रमेश सखाराम मोरे यांचे मंगळवारी रात्री ह्दयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
सांस्कृतिक आणि नाट्य क्षेत्रात गेली ४० वर्षे रमेश मोरे कार्यरत होते. चंद्रलेखा नाट्यसंस्थेचे व्यवस्थापक म्हणून त्यांनी अनेक वर्षे जबाबदारी पार पाडली.