अक्कलकोटची सून ‘सोनाली गोडबोले’ लढवत आहेत पोलीस खात्याची ‘खिंड’

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – अक्कलकोटची सून आणि पोलीस दलातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी सोनाली गोडबोले-पाटील या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या खात्याचा ठसा संपूर्ण अक्कलकोट तालुक्यात उमटविला आहे. विविध क्षेत्रात पादाक्रांत करून महिलांनी आपला ठसा सर्वच क्षेत्रात उमटविला आहे. चौकटीबाहेरचे क्षेत्र निवडून त्यात कर्तृत्व गाजवणाऱ्यापैकी एक म्हणजे अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सोनाली गोडबोले पाटील. 2017 मध्ये मध्ये गोडबोले येथे रुजू झाल्या आहेत.

तत्कालीन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे- पाटील यांनी स्थापन केलेल्या निर्भया पथकाचे अक्कलकोट उपविभागीय प्रमुख म्हणून त्यांची निवड केले. या पथकाच्या माध्यमातून काम करत असताना त्यांनी अक्कलकोट मधील सर्व कॉलेजला भेट देऊन विध्यार्थीनिचें अनेक प्रश्न सोडवून, सर्व कॉलेजमध्ये तक्रारपेटी बसवून, त्या तक्रारींचे शंका निवारण केले आहे.

त्यांनी आपल्या सिंघम स्टाईलने तब्बल चार हजार रोडरोमिओंवर आजपर्यंत कारवाई केल आहे. तर गुन्ह्याच्या बाबतीत पंधराहून अधिक गंभीर गुन्ह्यांचा तपास करून तालुक्यातील अनेक महिलांचे त्यांचे मनोबल वाढविले. एकीकडे हे सर्व करत असताना दुसरीकडे त्यांचे कार्य पाहून त्यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे. 2018 मध्ये पोलीस महासंचालक यांच्याकडून दोन वेळा रिवॉर्ड आणि त्याच वर्षी, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार, व त्याचवेळी वीरशैव पंचम समाजाकडून उत्कृष्ठ महिला अधिकारी म्हणून सन्मानित करण्यात आले. 2019 मध्ये निर्भया पथकाद्वारे उत्तम कामगिरी करत द्वितीय क्रमांक मिळवला.

“सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’” हे ब्रीद घेऊन, चेहऱ्याला मास्क लावून त्यांनी दोन वर्षांच्या बाळाला घरात सोडून आपले काम नेमून दिलेल्या हद्दीत गेल्या दीड महिन्यापासून नाकाबंदीच्या ठिकाणी काम करीत आहेत. ही नाकाबंदी कोण्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी किंवा दंगेखोरांना आळा घालण्यासाठी नाही. तर एका न दिसणाऱ्या विषाणूविरोधात आहे. या विषाणूचा संसर्ग पसरू नये, म्हणून नागरिकांना रस्त्यावर येण्यापासून रोखण्यासाठी त्या स्वतः अक्कलकोट-सोलापूर प्रमुख मार्गावर असलेले वीज मंडळाच्या समोरच्या चेक पोस्टवर कर्तव्य बजावत आहेत.

या जीवघेण्या विषाणूशी लढत असताना या जिल्ह्याचे खासदार, तसेच माजी गृहराज्यमंत्री सिद्धारम म्हेत्रे व तसेच तालुक्याचे नगराध्यक्ष खेडगी यांनी त्यांच्या टीमवर पुष्प वर्षाव करून त्यांचे कौतुक केले. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक कल्लप्पा पुजारी, पोलीस निरीक्षक विजय जाधव यांच्या सहकार्याने त्यांचे हे कार्य अविरतपणे चालू आहे.

अक्कलकोट विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांचे त्या धर्मपत्नी आहेत. अक्कलकोटची सून म्हणून त्यांना अक्कलकोट करांचे प्रेम आणि सहकार्य मिळाले आहे. पुढील वाटचालीस तुम्हाला व तुमच्या टीमला पोलीसनामा ऑनलाइन प्रतिनिधी महेश गायकवाड व पोलीस नामाऑनलाइन टीमच्या वतीने हार्दिक शुभेच्छ !