Akola ACB Trap | 4 हजार रुपयांची लाच घेताना महावितरणचा कार्यकारी अभियंता अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – अ‍ॅग्रीमेंट फाईलवर (Agreement File) सही करण्यासाठी चार हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (MSEDCL) अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला (Additional Executive Engineer) अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Akola ACB Trap) रंगेहात पकडले. अकोला एसीबीच्या पथकाने (Akola ACB Trap) ही कारवाई मंगळवारी (दि.27) अकोला येथील कंपनीच्या उपविभाग तीन कार्यालयात केली. नितीन कुमार नाथ्याबा पवार Nitin Kumar Nathyaba Pawar (वय-51) असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या अभियंत्याचे नाव आहे.

 

याबाबत अकोला येथील 31 वर्षाच्या तक्रारदाराने अकोला एसीबीकडे (Akola ACB Trap) 15 सप्टेंबर रोजी तक्रार केली आहे. तक्रारदार हे सोलर पॅनल (Solar Panel) बसवण्याचे काम करतात. सोलर पॅनल बसून दिल्यावर संबंधित ग्राहक व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (Maharashtra State Electricity Distribution Company Limited) यांच्या मधील नेट मीटरिंगच्या 4 एग्रीमेंट फाईलवर सह्या करण्यासाठी नितीन कुमार पवार यांनी एका एग्रीमेंट फाईलवर सही करण्यासाठी दोन हजार प्रमाणे 4 फाईलचे 8 हजार रुपयाची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी अकोला एसीबीकडे तक्रार केली.

 

एसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता नितीन कुमार पवार यांनी एका फाईलचे एक किंवा दोन हजार रुपये तुम्हाला जे योग्य वाटेल ते अशी मागणी केली. त्यानंतर 23 सप्टेंबर रोजी पुन्हा पडताळणी केली असता पवार यांनी तडजोडीअंती प्रत्येक फाईलचे एक हजार रुपये याप्रमाणे चार हजार रुपये मागणी केली. मंगळवारी पवार यांच्या कार्यालयात सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून 4 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले. आरोपी पवार याला ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र (Amravati Region)
पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड (SP Vishal Gaikwad), अपर पोलीस अधीक्षक अरुण सावंत (Addl SP Arun Sawant),
देविदास घेवारे (Addl SP Devidas Gheware), अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक उत्तम नामवाडे (Deputy Superintendent of Police Uttam Namwade)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार (Police Inspector Narendra Khairnar),
सचिन सावंत (Police Inspector Sachin Sawant), पोलीस नाईक किशोर पवार,
अभय बावस्कर, पोलीस कॉन्स्टेबल श्रीकृष्ण पळसपगार, निलेश शेगोकार यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Akola ACB Trap | Executive engineer of Mahavitaran caught in anti-corruption net while accepting bribe of Rs.4 thousand

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Abdul Sattar | शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदेंची निवड; अब्दुल सत्तारांची माहिती

Pune School Bus Accident | पुणे जिल्ह्यातील आंबेगाव मध्ये स्कूल बस दरीत कोसळली, 44 विद्यार्थी जखमी

Sanjay Raut | दिलासा नाहीच! संजय राऊतांचा दसराही न्यायालयीन कोठडीतच, न्यायालयाने जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली