दुर्दैवी ! 3 दिवसांत होता विवाह; लग्नापूर्वीच तरुणीचा अपघातात मृत्यू

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – अकोलामधील पातूर तालुक्यातील एक धक्कादायक आणि मन हेलावणारी घटना घडली आहे. भरधाव येणाऱ्या वाहतूक ट्रकने पाठीमागून दुचाकीला जोरात धडक दिल्याने दुचाकीवर असणारी तरुणी जागीच मृत्युमुखी पडली तर तिचे वडील जखमी झाले. ही घटना पातूर-बाळापूर रस्त्यावर गुरुवारी रात्रीच्या दरम्यान घडली.

पल्लवी धोत्रे असे मृत तरुणीचे नाव आहे. खरतर पल्लवीचे २६ एप्रिल रोजी लग्न होणार होते. विवाहा अगोदरच त्या तरुणीवर काळाने घाला घातला. खरतर पल्लवीचे २६ एप्रिल रोजी लग्न होणार होते. विवाहा अगोदरच त्या तरुणीवर काळाने घाला घातला. तरुणीच्या कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, पल्लवी ही पातूर तालुक्यातील विव्हरा येथे राहत होती. पल्लवी आणि तिचे वडील अनिल धोत्रे हे दुचाकीवरून पातूर-बाळापूर रस्त्यावरून वाडेगावकडे जात असताना देऊळगाव बसस्थानकाजवळ हा अपघात झाला. पातूर येथून देवीचे दर्शन घेऊन ते परत येत होते. त्याचवेळी गिट्टीने भरलेल्या ट्रॅक्टरने मागून त्यांच्या दुचाकीला धडक दिली. पल्लवीच्या अंगावरून चाक गेल्याने ती अंत्यंत गंभीर जखमी झाली, त्या दोघांना रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यावरून त्या ट्रॅक्टर चालकास पोलिसांनी अटक केलीय.