Coronavirus : अकोला जिल्ह्यात गेल्या 24 तासात 64 नवे पॉझिटिव्ह तर 5 जणांचा मृत्यू

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 369 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 305 अहवाल निगेटीव्ह तर 64 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्याच प्रमाणे काल (दि. 1) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये पाच तर खाजगी लॅब मध्ये आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 4142 (3305+743+94) झाली आहे. आज दिवसभरात 33 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 28440 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 27700, फेरतपासणीचे 180 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 560 नमुने होते. आजपर्यंत एकूण 28206 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 24901 तर पॉझिटीव्ह अहवाल 4142 (3305+743+94) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 64 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात 64 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी 62 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात 20 महिला व 42 पुरुष आहे. त्यात मूर्तिजापूर येथील 24 जण,आलेगाव येथून सहा जण, गोरक्षण येथे चार, डाबकी रोड, सिंधी कॅम्प, पातूर येथील प्रत्येकी तीन जण, मलकापूर, शिवचरण पेठ, कृषी नगर येथील प्रत्येकी दोन जण तर उर्वरित रणपिसे नगर, गणेश नगर, कान्हेरी गवळी, ज्योती नगर, बाळापूर, बोरगांव मंजू, जुने शहर, कौलखेड, वाडेगाव, जठारपेठ, मोठी उमरी, कुरणखेड व इंदिरा नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात एक महिला व एक पुरुष असून ते बाळापूर व मुर्तिजापूर येथील रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. तसेच ध्रुव पॅथॉलॉजी लॅब नागपूर या खाजगी प्रयोगशाळेत झालेल्या चाचण्यात आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. या चाचण्या डॉ. हेडगेवार हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर, अकोला यांच्या मार्फत राबविण्यात येत आहेत. त्यांचाही समावेश आजच्या अहवालात करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

पाच मयत

दरम्यान आज पाच जणाचा मृत्यू झाला. यात रामदास पेठ, अकोला येथील 76 वर्षीय पुरुष असून तो दि. 26 ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला, मुर्तिजापूर येथील 65 वर्षीय पुरुष असून तो दि. 28 ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. तर मूर्तिजापूर येथील 23 वर्षीय महिलेचा मृत्यूनंतर घेतलेल्या कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, बाळापूर येथील २६ वर्षीय पुरुष पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यांचाही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तसेच मुर्तिजापूर येथील 61 वर्षीय महिला असून तिचा खाजगी रुग्णालयात उपचार घेतांना मृत्यू झाला.

33 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून नऊ जणांना, उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथून एक जण, आयकॉन हॉस्पीटल येथून चार जण, हॉटेल रिजेन्सी येथून तीन जण, हॉटेल रणजीत येथून तीन जण तर कोविड कोरोना सेंटर, हेडज मुर्तिजापूर येथून 13 जणांना अशा एकूण 33 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

697 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 4142 (3305+743+94) आहे. त्यातील 159 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 3286 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 697 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.