Coronavirus : अकोला जिल्ह्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 86 नवे पॉझिटिव्ह तर दोघांचा मृत्यू

अकोला,पोलीसनामा ऑनलाइन  – आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 359 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 273 अहवाल निगेटीव्ह तर 86 अहवाल पॉझिटीव्ह आले.

त्याच प्रमाणे काल (दि. 11) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये सात तर खाजगी लॅब मध्ये आज सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 5382 (4288+940+154) झाली आहे. आज दिवसभरात 100 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 32677 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 31814, फेरतपासणीचे 193 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 670 नमुने होते. आजपर्यंत एकूण 32276 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 27988 तर पॉझिटीव्ह अहवाल 5382 (4288+940+154) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 86 पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरात 86 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी ५० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १४ महिला व ३६ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील खोलेश्वर येथील चार जण, तापडीया नगर व कौलखेड येथील प्रत्येकी तीन जण, निमवाडी, रामनगर, रणपिसे नगर, बाळापूर नाका, महान व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित शास्त्री नगर, खेतान नगर, जितापूर ता. अकोट, गितानगर, जेतवन नगर, मलकापूर, खेडकर नगर, बलोदे लेआऊट, लहान उमरी, अकोट, करोडी ता. अकोट, गोरक्षण रोड, राऊतवाडी, डोंगरगाव, संतोषनगर, खैर मोहम्मद प्लॉट, खडकी, रेणुकानगर, शास्त्री नगर, गजानन पेठ, डाबकी रोड, पारस, कांचनपूर, वाशिंबा, बार्शिटाकळी, वाडेगाव, उमरी व शिर्ला अंधारे येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी ३६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १६ महिला व २० पुरुषांचा समावेश आहे. त्यातील बोर्टा ता. मुर्तिजापूर येथील सात जण, अकोट येथील चार जण, चोहाट्टा बाजार, धानोरी ता.अकोट, तोष्णीवाल लेआऊट व केशवनगर येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित सुभाष चौक, बार्शीटाकळी, पळसोड ता.अकोट, नायगाव, डाबकी रोड, आळशी प्लॉट, माळीपुरा, सिंधी कॅम्प, मधूभारती अपार्टमेंट,जूना कापड मार्केट, गजानन नगर डाबकी रोड, भारती प्लॉट जूने शहर, तारफैल, मलकापूर, मनोरथ कॉलनी, तुकाराम चौक व बापूनगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. तसेच ध्रुव पॅथॉलॉजी लॅब, नागपूर या खाजगी प्रयोगशाळेतून आज सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, कृपया नोंद घ्यावी.

दोन मयत
दरम्यान आज दोघांचा मृत्यू झाला. त्यात जिल्हा परिषद कॉलनी, शास्त्री नगर, अकोला येथील ६० वर्षीय पुरुष असून तो दि. ११ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्याचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेताना मृत्यू झाला. तसेच एकाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. हा रुग्ण जठारपेठ,अकोला येथील ४७ वर्षीय पुरुष असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

100 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४३ जण, कोविड केअर सेंटर अकोला येथून १३ जण, ओझोन हॉस्पिटल येथून दोन जण, हॉटेल रिजेन्सी येथून तीन जण, कोविड केअर सेंटर, अकोट येथून ११ जण, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथून तीन जण, तर कोविड केअर सेंटर, हेंडज मुर्तिजापूर येथून २५ जणांना असे एकूण १०० जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

1088 रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 5382 (4288+940+154) आहे. त्यातील 177 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 4117 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 1088 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.