Coronavirus : अकोला जिल्ह्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 196 नवे पॉझिटिव्ह तर 4 जणांचा मृत्यू

अकोला,पोलीसनामा ऑनलाइन -आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 328 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 132 अहवाल निगेटीव्ह तर 196 अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच आज चार मयत झाले.

त्याच प्रमाणे काल (दि. 16) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 28 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 6163(5006+102+155) झाली आहे. आज दिवसभरात 103 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 34322 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 33424, फेरतपासणीचे 195 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 703 नमुने होते. आजपर्यंत एकूण 33777 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 28771 तर पॉझिटीव्ह अहवाल 6163(5006+102+155) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 196 पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरात 196 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी १६५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 64 महिला व 101 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मोठी उमरी येथील 11 जण, कोलखेड येथील 10 जण, गौरक्षण रोड व जीएमसी हॉस्टेल येथील प्रत्येकी नऊ जण, आदर्श कॉलनी, रणपिसे नगर, जूने शहर येथील आठ जण, डाबकी रोड, लहान उमरी येथील प्रत्येकी सात जण, शास्त्री नगर, तोष्णीवाल लेआऊट व साहूरा हॉस्पीटल जवळ येथील प्रत्येकी सहा जण,तापडीया नगर येथील पाच जण, जठारपेठ व खेडकर नगर येथील चार जण, चिंचोली रुद्रायणी ता. बार्शीटाकळी,खडकी, चोट्टाबाजार,तारफैल,शिवणी, तेल्हारा, मलकापूर, दुर्गा चौक, तुकाराम चौक, बाळापूर नाका, जिल्हा परिषद कॉलनी, अमृतवाडी ता. मुर्तिजापूर, धाबा व सुधीर कॉलनी येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित कच्ची खोली, खोलेश्वर,न्यु खेतान नगर, देवराबाबा चौक, अकोट फैल, आपातापा, सोनाला, सानवी पेठकर रोड, बाळापूर, वाशिम बायपास, रुहीखेड ता. अकोट, दांळवी, गोयका लेआऊट, घाटे हॉस्पीटल, जवाहर नगर, पत्रकार कॉलनी, भागवत वाडी, वृंदावन नगर, रविनगर, अकोट, बार्शीटाकळी, बोरगाव मंजू, रामदास पेठ, पिकेव्ही, कोलसा, दहिहांडा, जेतवन नगर व मुझीफ्फर नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी 31 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 11 महिला व 20 पुरुषांचा समावेशआहे. त्यातील देशमुख पेठ लोहार गल्ली येथील सहा जण, डाबकी रोड, जीएमसी व जागृती विद्यालय येथील प्रत्येकी तीन जण, जठारपेठ, चिंतामणी नगर, पारस व मलकापूर येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित एलएच क्वॉटर, सिंधी कॅम्प, अकोट फैल, गौरक्षण रोड, रामदास पेठ, खडकी, भावसिंग सोसायटी व शनिवार पेठ अंजनगाव सूर्जी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये 28 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कृपया नोंद घ्यावी.

चार मयत
दरम्यान आज चार जणांचा मृत्यू झाला. त्यात रणपिसे नगर, अकोला येथील 51 वर्षीय पुरुष असून तो दि. 16 सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला, पांटोडा, अकोला येथील 55 वर्षीय महिला असून ती 9 सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला, शिवनी, अकोला येथील 65 वर्षीय पुरुष असून तो दि. 13 सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला. तर रणपिसे नगर, अकोला येथील 75 वर्षीय पुरुष असून तो 14 सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला.

103 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 12 जण, कोविड केअर सेंटर अकोला येथून 39 जण, उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथून पाच जण, आयकॉन हॉस्पीटल येथून सहा जण, ओझोन हॉस्पीटल येथून दोन जण, कोविड केअर सेंटर, हेंडज मुर्तिजापूर येथून 20 जण, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथून सात जण, कोविड केअर सेंटर बाळापूर येथून दोन जण, कोविड केअर सेंटर,अकोट येथून 10 जणांना असे एकूण 103 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

1374 रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 6163(5006+102+155) आहे. त्यातील 196 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 4593 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 1374 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like