Coronavirus : अकोल्या गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 78 नवे पॉझिटिव्ह तर तिघांचा मृत्यू

अकोला,पोलीसनामा ऑनलाइन – आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 361 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 283 अहवाल निगेटीव्ह तर 78 अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच आज तीन मयत झाले.

त्याच प्रमाणे काल (दि.25) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 10 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 7092(5841+1096+155) झाली आहे. आज दिवसभरात 36 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 37668 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 36712, फेरतपासणीचे 205 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 751 नमुने होते. आजपर्यंत एकूण 36945 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 31104 तर पॉझिटीव्ह अहवाल 7092(5841+1096+155) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 78 पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरात 78 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी ६७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात १५ महिला व ५२ पुरुष आहेत. त्यातील गोरक्षण रोड येथील सहा जण, अकोट येथील पाच जण, अमनखा प्लॉट व बाळापूर येथील प्रत्येकी चार जण, जीएमसी, खडकी, राऊतवाडी, व मूर्तिजापूर येथील तीन जण, पातूर, बोर्डी, सिव्हिल लाईन, वानखेडे नगर, रणपिसे नगर, जवाहर नगर, सिंधी नगर, कौलखेड, वडद, बोरगाव मंजू व डाबकी रोड येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित खामखेड ता. पातूर, मारोती नगर, स्टेशन रोड, रतनलाल प्लॉट, रामदास पेठ, सुधीर कॉलनी, द्वारका नगरी, कोलंबी, चागेफल, गिरिनगर, आसरा कॉलनी, रेणुका नगर, गोडबोले प्लॉट व निमवाडी येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात चार महिला व सात पुरुष आहे. त्यातील कान्हेरी सरप येथील दोन जण, तर उर्वरित मराठा नगर, खोलेश्वर, गड्डम प्लॉट, मोठी उमरी, वाशिम बायपास, वखारीया नगर, जठारपेठ, बार्शीटाकळी व सूकळी येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये 10 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कृपया नोंद घ्यावी.

तीन मयत
दरम्यान आज तीन जणाचा मृत्यू झाला. त्यातील जुने शहर, अकोला येथील ६५ वर्षीय पुरुष असून तो दि. १० सप्टेंबर दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला, अकोट फाईल येथील ८४ वर्षीय पुरुष असून तो दि. १८ सप्टेंबर दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला, तर महसूल कॉलनी, अकोला येथील ५८ वर्षीय पुरुष असून तो दि. १७ सप्टेंबर दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

36 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून २५ जणांना, कोविड केअर सेंटर, अकोला येथून सहा जण, आर्युवेदीक महाविद्यालय येथून एक जण, हॉटेल रिजेन्सी येथून तीन जण, हॉटेल स्कायलॉक येथून एक जणांना, अशा एकूण ३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

1497 रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 7092(5841+1096+155) आहे. त्यातील 224 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 5371 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 1497 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.