Coronavirus : अकोला जिल्ह्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 87 नवे पॉझिटिव्ह तर 7 जणांचा मृत्यू

अकोला, पोलीसनामा ऑनलाइन -आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 386 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 299 अहवाल निगेटीव्ह तर 87 अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच आज सात मयत झाले.
त्याच प्रमाणे काल (दि.29) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 15 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 7482(6138+1189+155) झाली आहे. आज दिवसभरात 185 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 39037 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 38070, फेरतपासणीचे 208 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 759 नमुने होते. आजपर्यंत एकूण 38223 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 32085 तर पॉझिटीव्ह अहवाल 7482(6138+1189+155) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 87 पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरात 87 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 45 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात 18 महिला व 27 पुरुष आहे. त्यातील गोकुल कॉलनी येथील सात जण, जठारपेठ येथील सहा जण, सिंधी कॅम्प येथील चार, डाबकी रोड व केडीया प्लॉट येथील प्रत्येकी तीन जण, आदर्श कॉलनी येथील दोन जण, तर उर्वरित मनकर्णा प्लॉट, रामदासपेठ, छोटी उमरी, राधानगर, अंबिका नगर, आळशी प्लॉट, मुर्तिजापूर, खडकी, सिरसो, हिवरखेड, फिरदोस कॉलनी, भावसारपूरा, शांती नगर, शिवसेना वसाहत, आरएलटी कॉलेज, आरएमओ हॉस्टेल, गुलजारपुरा, शास्त्री नगर, सातव चौक व अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी 42 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात 10 महिला व 32 पुरुष आहे. त्यातील अकोट येथील नऊ जण, मुर्तिजापूर येथील आठ जण, बाळापूर व कोठारी येथील तीन जण, पारस व बोर्डी येथील दोन जण तर उर्वरित जठारपेठ, गुजराती पुरा, निंबा, रणपिसे नगर, जूने शहर, बोरगाव मंजू, व्हीएसबी कॉलनी, तुलंगा, गीतानगर, श्रीराम हॉस्पीटल, डाबकी रोड, पोही, शेलू, कौलखेड व जठारपेठ येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये 21 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कृपया नोंद घ्यावी.

सात मयत
दरम्यान सात जणांचे मृत्यू झाले. त्यातील डाबकी रोड, अकोला येथील 64 वर्षीय पुरुष असून तो 14 सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला, सिव्हील लाईन येथील 55 वर्षीय पुरुष असून तो 29 सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला, मलकापूर येथील 65 वर्षीय पुरुष असून तो 26 सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला, जोगळेकर प्लॉट येथील 75 वर्षीय पुरुष असून तो 24 सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला, वडद, अकोला येथील 70 वर्षीय पुरुष असून तो 25 सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला, पातूर येथील 65 वर्षीय पुरुष असून तो 19 सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला तर गजानन नगर, अकोट येथील 72 वर्षीय पुरुष असून ते 26 सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला.

185 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 24 जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून आठ जण, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथून दोन जण, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन जण, अकोला ॲक्सीडेंट क्लिनिक येथून दोन जण, सूर्यचंद्रा हॉस्पीटल येथून तीन जण, आर्युवेदीक हॉस्पीटल येथून चार जण, हॉटेल रिजेन्सी येथून तीन जण, हॉटेल स्कॉयलॉर्क येथून दोन जण,कोविडा केअर सेंटर हेंडज मुर्तिजापूर येथून पाच जण तर होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेले 130 जणांना, अशा एकूण 185 जणांना डिस्चार्ज देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

1372 रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 7482(6138+1189+155) आहे. त्यातील 236 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 5874 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 1372 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.