Coronavirus : अकोला जिल्ह्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 24 नवे पॉझिटिव्ह तर एकाचा मृत्यू

अकोला,पोलीसनामा ऑनलाइन – आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 167 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 143 अहवाल निगेटीव्ह तर 24 अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच आज एक मयत झाले.
त्याच प्रमाणे काल (दि.7) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 7741(6300+1286+155) झाली आहे. आज दिवसभरात 42 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 40081 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 39077 फेरतपासणीचे 208 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 796 नमुने होते. आजपर्यंत एकूण 39929 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 33629 तर पॉझिटीव्ह अहवाल 7741(6300+1286+155) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 24 पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरात 24 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 20 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात चार महिला व 16 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील बार्शीटाकळी येथील तीन जण, गीता नगर व मलकापूर येथील प्रत्येकी दोन उर्वरित राजपूतपुरा जवळ, जवळका ता. अकोट, अजनी ता. बार्शीटाकळी, कृषी नगर, आदर्श कॉलनी, मोहम्मद अली रोड, संतोषी माता मंदिरजवळ, खदान, शिवाजी चौक, शिवनी, अकोट, जीएमसी व निंभोरा येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात एक महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट, फुले चौक, मुर्तिजापूर व बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहे,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कृपया नोंद घ्यावी.

42 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 31 जणांना, कोविड केअर सेंटर, अकोला येथून चार जण, अवघाते हॉस्पीटल मुर्तिजापूर येथून एक जण, अकोला अक्सीडेंट क्लिनीक येथून पाच जण व सुर्यचंद्रा हॉस्पीटल येथून एक जणांना, अशा एकूण 42 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

एक मयत
दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. त्यात संतषी माता मंदिरजवळ, रामदासपेठ येथील 65 वर्षीय पुरुष असून ते 6 ऑक्टोंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला.

797 रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 7741(6300+1286+155) आहे. त्यातील 249 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 6695 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 797 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.