Coronavirus : अकोला जिल्ह्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 32 नवे पॉझिटिव्ह तर एकाचा मृत्यू

अकोला, पोलीसनामा ऑनलाइन – आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 140 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 108 अहवाल निगेटीव्ह तर 32 अहवाल पॉझिटीव्ह आले. तर एक मयत आहे.  त्याच प्रमाणे काल (दि.14) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 7937(6426+1350+161) झाली आहे. आज दिवसभरात 24 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 41067 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 40022 फेरतपासणीचे 209 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 836 नमुने होते. आजपर्यंत एकूण 40900 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 34474 तर पॉझिटीव्ह अहवाल 7937(6426+1350+161) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 32 पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरात 32 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 27 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सात महिला व 20 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील खापररखेडा ता. मुर्तिजापूर, केळकर हॉस्पीटल व मोठी उमरी येथील प्रत्येकी तीन जण, जठारपेठ, मुर्तिजापूर व डाबकी रोड येथील प्रत्येकी दोन जण तर उर्वरित अकोट फाईल, आगार, फडके नगर, आंबेडकर नगर, बाळापूर, पक्की खोली, तेल्हारा, चावरे प्लॉट, जीएमसी, सिव्हील लाईन, सिटी कोतवल व खदान येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात एक महिला व चार पुरुषांचा समावेश आहे. त्यात रामदासपेठ येथील तीन जण तर उर्वरित हरिहरपेठ व मलकापूर येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कृपया नोंद घ्यावी.

24 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 11 जणांना, कोविड केअर सेंटर येथून आठ जण, स्कायलार्क हॉटेल येथून एक जण, अवघते हॉस्पीटल येथून दोन जण तर ॲक्सीडेंट अकोला क्लिनिक येथून दोन जण, जणांना अशा एकूण 24 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

एक मयत
दरम्यान आज एका जणाचा मृत्यू झाला. हा रुग्ण डाबकी रोड येथील 63 वर्षीय महिला असून ती 17 सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला.

388 रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 7937(6426+1350+161) आहे. त्यातील 261 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 7288 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 388 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.