Coronavirus : अकोला जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 22 नवे पॉझिटिव्ह तर दोघांचा मृत्यू

अकोला, पोलीसनामा ऑनलाइन – आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 121 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 99 अहवाल निगेटीव्ह तर 22 अहवाल पॉझिटीव्ह आले. तर दोन मयत आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.15) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 12 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 7971 (6448+1362+161) झाली आहे. आज दिवसभरात 12 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 41222 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 40168 फेरतपासणीचे 212 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 842 नमुने होते. आजपर्यंत एकूण 41021 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 34573 तर पॉझिटीव्ह अहवाल 7971 (6448+1362+161) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 22 पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरात 22 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 21 जणांचे अहवा ल पॉझिटीव्ह आले. त्यात 13 महिला व आठ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील शिवनी, सिंधी कॅम्प व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी दोन जण तर उर्वरित खडकी, गोडबोले प्लॉट, जीएमसी हॉस्टेल, उमरी, जठारपेठ, विद्युत कॉलनी, व्दारका नगरी, संभाजी नगर, करोडी ता अकोट, राऊतवाडी, मारोडा, जीएमसी, भीमनगर, उगावा व पैलपाडा येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक पुरुष असून तो जठारपेठ येथील रहिवासी आहे,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये 12 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कृपया नोंद घ्यावी.

12 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून आठ जणांना, आयकॉन हॉस्पीटल येथून एक जण, हॉस्पीटल ओझोन येथून एक जण, हॉटेल रिजेन्सी येथून एक जण तर अवघते हॉस्पीटल येथून एक जणांना अशा एकूण 12 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

दोन मयत
दरम्यान आज दोघांचा मृत्यू झाला. त्यात उगवा, अकोट फैल येथील ६५ वर्षीय पुरुष असून तो दि. १४ ऑक्टोंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला, तर शिवर, अकोला येथील महिला असून ती ९ ऑक्टोंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला

408 रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 7971 (6448+1362+161) आहे. त्यातील 263 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 7300 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 408 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.