Coronavirus : अकोला जिल्ह्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 76 नवे पॉझिटिव्ह तर एकाचा मृत्यू

अकोला,पोलीसनामा ऑनलाइन -आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 290 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 214 अहवाल निगेटीव्ह तर 76 अहवाल पॉझिटीव्ह आले.

त्याच प्रमाणे काल (दि. 2) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये नऊ तर खाजगी लॅब मध्ये कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 4227 (3381+752+94) झाली आहे. आज दिवसभरात 57 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 28744 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 27996, फेरतपासणीचे 181 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 567 नमुने होते. आजपर्यंत एकूण 28496 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 25115 तर पॉझिटीव्ह अहवाल 4227 (3381+752+94) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 76 पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरात 76 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी 72 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात 26 महिला व 46 पुरुष आहे. त्यात मोहरल बार्शिटाकळी येथील 20 जण, बोरगाव मंजू येथील प्रत्येकी पाच जण, डाबकी रोड येथील चार जण, अकोली जहागीर व जीएमसी येथील प्रत्येकी तीन जण, कान्हेरी, कृषी नगर, बाळापूर व बिर्ला कॉलनी येथील प्रत्येकी दोन जण तर उर्वरित तुकाराम नगर, बालाजी नगर, शास्त्री नगर, मराठा नगर, गुडधी, शिवसेना नगर, अडगाव, शंकर नगर, गौरक्षण रोड, जठारपेठ, सरस्वती भवन, आलेगाव ता.पातूर, गीता नगर, तेल्हारा, सुधीर कॉलनी, मोमीनपुरा, झोडगा ता.बार्शीटाकळी, जवाहर नगर, धामनधरी ता. बार्शीटाकळी, दोनद ता. बार्शीटाकळी, एसपी ऑफीस जवळ, मॉउंट कॉरमेल जवळ, न्यु तापडीया, छोटी उमरी, उमरी, खेळकर नगर, गोरेगाव, एरंडा ता. बार्शीटाकळी व चोहट्टा बाजार येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.तसेच सायंकाळी चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात एक महिला व तीन पुरुष आहे. अकोट फैल, डाबकी रोड, तेल्हारा व अकोट येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. तसेच ध्रुव पॅथॉलॉजी लॅब नागपूर या खाजगी प्रयोगशाळेतून आज कोणाचेही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

एक मयत
दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण पातूर येथील 72 वर्षीय पुरुष असून ते 31 ऑगस्ट रोजी दाखल झाले होते. त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला.

57 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 23 जणांना, कोविड केअर सेंटर, अकोला येथून 13 जण, उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथून तीन जण, आयकॉन हॉस्पीटल येथून चार जण, हॉटेल रणजीत येथून 11 जण तर कोविड कोरोना सेंटर, हेडज मुर्तिजापूर येथून तीन जणांना अशा एकूण 57 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

697 रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 4227 (3381+752+94) आहे. त्यातील 160 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 3343 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 724 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.