Coronavirus : अकोला जिल्ह्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 111 नवे पॉझिटिव्ह तर चौघांचा मृत्यू

अकोला – पोलीसनामा ऑनलाइन – आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 418 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 307 अहवाल निगेटीव्ह तर 111 अहवाल पॉझिटीव्ह आले.

त्याच प्रमाणे काल (दि. 8) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 26 तर खाजगी लॅब मध्ये 18 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 4964 (3982+835+147) झाली आहे. आज दिवसभरात 98 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 31458 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 30625, फेरतपासणीचे 188 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 645 नमुने होते. आजपर्यंत एकूण 31100 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 27118 तर पॉझिटीव्ह अहवाल 4964 (3982+835+147) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 111 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात 111 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी ८८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ३२ महिला व ५६ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील म्हैसांग व डाबकी रोड येथील प्रत्येकी आठ जण, जीएमसी येथील सात जण, कटयार, खदान व तांदळी बु. ता. पातूर येथील चार जण, लहान उमरी, सिंधे कॅम्प, मोठी उमरी, गौरक्षण रोड येथील प्रत्येकी तीन जण, मलकापूर, जठारपेठ, पोलिस स्टेशन चन्नी, कौलखेड, रजपूतपुरा ता. बाळापूर, रेणूका नगर व बाळापूर येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित पिंपरगाव छाब्रे ता. बार्शिटाकळी, परसोबढे, खेडा, गिता नगर, संत नगर, रणपिसे नगर, कुबेर नगर, गीता नगर, रेल्वे पोलिस, मालीपूरा, वाखना वाघ, पिंपरी ता.अकोट, खेतान नगर, दिगरस ता. पातूर, अकोट फैल, खापरवाडा, वाडेगाव ता.बाळापूर, जूने शहर, केशवनगर, मलकापूर, निमवाडी, तापडीया नगर, पिंजर, तेल्हारा, शास्रीनेनगर, मुर्तिजापूर व बेलूरा (खु.) येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी २३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आठ महिला व १५ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील आळशी प्लॉट येथील चार जण, गोरक्षण रोड येथील तीन जण, गाडेगाव ता. तेल्हारा, रामदास पेठ, कौलखेड, मोठी उमरी, आदर्श कॉलनी व सुधीर कॉलनी येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित महसूल कॉलनी, जठारपेठ, मलकापूर व अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये 26 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. तसेच ध्रुव पॅथॉलॉजी लॅब, नागपूर या खाजगी प्रयोगशाळेतून आज 18 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, कृपया नोंद घ्यावी.

चार मयत

दरम्यान आज चार जणांचे मृत्यू झाले. त्यात अकोट फैल, अकोला येथील ६६ वर्षीय पुरुष असून तो दि. ६ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला, गणेश नगर डाबकी रोड, अकोला येथील ८४ वर्षीय पुरुष असून तो दि. ३ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता.त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला, बाळापूर येथील ५५ वर्षीय पुरुष असून तो दि. ३१ ऑगस्ट रोजी दाखल झाला. त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला. तर दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण रजनापूर, ता. मुर्तिजापूर येथील ६० वर्षीय पुरुष असून तो दि. ५ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला.

98 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ६४ जण, कोविड केअर सेंटर, अकोला येथून २८ जण, हॉटेल रिजेन्सी येथून पाच जण, तर कोविड केअर सेंटर, बार्शीटाकळी येथून एक जणांना असे एकूण ९८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

1066 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 4964 (3982+835+147) आहे. त्यातील 172 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 3726 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 1066 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.