Akola Crime News | धक्कादायक ! अनैतिक संबंधातून 6 जणांनी एका विवाहित महिलेला कट रचून पाजलं विष

खामगाव : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Akola Crime News | अनैतिक संबंधातून (Immoral Relation) एका विवाहित महिलेला (Married woman) सहा जणांनी कट रचून विषारी औषध (Poison) पाजल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिला घरात एकटी असताना सहा जणांनी जबरदस्तीने घरात प्रवेश करुन महिलेला धमकावले तसेच तिला विषारी औषध पाजलं. महिलेने आरडा ओरडा केल्यानंतर शेजारी राहणाऱ्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणातील महिलेची प्रकृती गंभीर असून उपचारादरम्यान महिलेचा जबाब नोंदवून पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.(Akola Crime News)

मेहराज ख्यतून युनुस खान (वय-30) असं विष पाजलेल्या महिलेचं नाव आहे. मागील काही दिवसांपासून तिच्या पतीचं फर्जना परवीन नावाच्या महिलेसोबत अनैतिक संबंध सुरू होते. या घटनेची माहिती पीडित महिलेला समजल्यानंतर पती-पत्नीत वाद झाले होते. याच कारणामुळे दोघांमध्ये मागिल अनेक दिवसांपासून वाद सुरु आहेत.

दरम्यान, 3 जुलै रोजी पती घरात नसताना आरोपी प्रेयसी फर्जाना परवीन, अब्दुल जब्बार, रेहाना, नजराना, अब्दुल गौस आणि त्याची पत्नी अशी 6 जणांनी पीडित महिलेच्या घरात प्रवेश केला. तू घरातून निघून जा, अशी धमकी देत आरोपींनी पीडित महिलेसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्याचवेळी आरोपी फर्जाना परवीननं उंदीर मारण्याचे औषध ग्लासमध्ये ओतून जबरदस्तीने पीडित महिलेला पाजले. त्यावेळी तिने आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून शेजारच्यांनी घराकडे धाव घेतली.

घराबाहेर नागरिकांची गर्दी होत असल्याचे समजल्यावर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला.
घटना घडल्यानंतर पीडित महिलेने झालेल्या भांडणाबद्दल पतीला दोन दिवस काहीच सांगितले नाही.
मात्र 5 जुलै रोजी पीडित महिलेची प्रकृती खालावली. त्यामुळे सुरुवातीला खासगी रुग्णालयात
आणि त्यानंतर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती अधिकच
खालावल्याने पीडित महिलेला अकोला येथे हलवण्यात आले. याठिकाणी उपचार सुरु असताना
पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदवून घेत आरोपींवर गुन्हा दाखल केला.

हे देखील वाचा

MP Sanjay Raut । पिंपरी-चिंचवड महापालिकेत सेनेचाच महापौर होणार; संजय राऊत म्हणाले…

Pune Crime News | लोणीकाळभोर पोलिसांनी विशेष मोहिमेत सराईत गुन्हेगाराला पकडलं, गावठी पिस्तुलासह काडतुस जप्त

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Akola Crime News | husbands immoral relation with another woman lover poisoned married woman with help of 6 people akola

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update