Akola Crime News | धक्कादायक ! सैन्य दलात असलेल्या पतीने पत्नीचा गळा चिरला; नंतर स्वतःच सासूला फोन करुन दिली माहिती

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन – Akola Crime News | अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून तिची निर्घृणपणे हत्या केली. हि घटना 22 फेब्रुवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास अकोला जिल्ह्यातील खरप नाल्याजवळ घडली आहे. या प्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. (Akola Crime News)

काय घडले नेमके?
अकोला जिल्ह्यातील आपातापा रस्त्यावरील संत कबीर नगरातील रहिवासी सदाशिव महादेव भालेराव (वय 73, सासरे.) यांच्या मुलीचा विवाह 2017 मध्ये विकास वाल्मीक इंगळे (वय 31, रा. गोंधापूर) याच्यासोबत झाला होता. त्यांचा प्रेमविवाह होता. विकास हा सैन्य दलात असून त्यांना एक मुलगा आहे. तेव्हापासून दोघे पती-पत्नी नागपूरला राहतात. त्यांच्या लग्नाला आई-वडिलांचा प्रचंड विरोध होता. काही दिवसांपूर्वी विकास इंगळे हा सुट्टीवर आला तो सासरे सदाशिव भालेराव यांच्याकडे आला. यावेळी जावई विकास इंगळे याने त्याचा फ्लॅट आईच्या नावाने केला असल्यामुळे पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. यानंतर त्याच दिवशी सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास दोघेही पती-पत्नी व मुलगा दुचाकीने गोंधापूरला जाण्यासाठी निघाले.

यादरम्यान विकास इंगळे याने सासूला फोन करून खरप नाल्याजवळ तुमच्या मुलीच्या गळ्यातील चेन कुणीतरी
अज्ञात चोरट्याने तोडल्यामुळे तिचा गळा चिरला आहे. तिला शासकीय रुग्णालयात घेऊन जात आहे असे सांगितले.
यानंतर तिच्या आईवडिलांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली.
रुग्णालयात गेल्यावर मुलीने कोणी चोरट्याने चेन चोरली नसून, पतीने म्हणजे विकास इंगळे याने चाकूने गळा चिरल्याचे सांगून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.
यानंतर सिव्हिल लाइन पोलिसांनी विकास इंगळे याच्याविरुद्ध 307 नुसार गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी विकासच्या सासऱ्याने त्याला जाब विचारला असता त्याने त्यांच्यावरदेखील हल्ला केला.
त्याला विरोध केल्यामुळे भालेराव यांच्या हाताला व बोटांना जखम झाली.
या दोघां पती- पत्नींमध्ये याअगोदरदेखील वाद होत होते. या प्रकरणी बोरगाव मंजू पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.

Web Title :- Akola Crime News | wife survive attack by husband with knief

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Solapur Crime News | पतीच्या मृत्यूनंतर मुलाला मोठ्या कष्टाने शिकवून इंजिनिअर बनवल्यानंतर मुलाचा अपघाती मृत्यू; महिलेचा आक्रोश

Pune Crime News | कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन करुन देण्याच्या बहाण्याने गुंगीचे औषध देऊन तरुणीवर बलात्कार; फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन लुबाडले सव्वा लाख रुपये

Nagpur Crime News | प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून फेसबुक पोस्ट करुन प्रियकराने संपविले जीवन