Akola Crime | ‘मला सासु-सासऱ्यांनी मारहाण केलीय, मी आता…’, पोलिसांच्या 112 नंबरवर फोन करुन तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

अकोला: पोलीसनामा ऑनलाईन – माहेरी आलेल्या पत्नीला घेऊन जाण्यासाठी आलेल्या तरुणाला त्याच्या सासू-सासऱ्याने बेदम मारहाण केली. त्यामुळे नैराश्य येऊन तरुणाने आत्महत्या (Akola Crime) केल्याची घटना घडली आहे. हितेश बबनराव मोरे (वय-27) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्या (Akola Crime) करण्यापूर्वी त्याने पोलीस मदत केंद्रात फोन करून गळफास घेऊन आत्महत्या करत आहे, अशी माहिती पोलिसांना दिली. मात्र पोलिसांना त्याच्यापर्यंत पोहोचण्यास उशीर झाला.

मुर्तीजापुर तालुक्यातील सिरसो गावचा रहिवासी असलेला हितेश मोरे याचे त्याच्या पत्नीसोबत किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्यानंतर पत्नी माहेरी निघून गेली होती. बरेच दिवस झाले तरी पत्नी परत येत नसल्याने हितेश पत्नी आणि मुलाला घेऊन जाण्यासाठी काल अमरावती जिल्ह्यातील आसेगाव येथील सासरवाडीत आला होता. पण त्याच्या सासू-सासर्‍यांनी पत्नीला त्याच्या सोबत पाठवण्यास नकार दिला आणि त्याला मारहाण केली. (Akola Crime)

त्यानंतर तो घरी परत आला. मारहाणीच्या घटनेमुळे त्याला नैराश्य आले होते. यातून त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला. पण आत्महत्या करण्याआधी त्याने पोलिसांच्या 112 या पोलीस हेल्पलाइन क्रमांकावर फोन केला. मला सासू-सासऱ्याने मारहाण केली आहे, मी आत्महत्य करतोय, असे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी लगेच हितेशच्या घराकडे धाव घेतली. मात्र तोपर्य़ंत हितेशने घरात गळफास घेऊन आपलं जिवन संपलं होतं. पुढील तपास मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस करीत आहेत.

दरम्यान, दुसऱ्या घटनेत एका शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे.
प्रकाश श्रीराम मकेश्वर (वय ४२) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
ही घटना मुर्तीजापुर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत घडली आहे.
मकेश्वर यांनी कर्ज काढून तीन एकर शेतात पेरणी केली.
मात्र या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांना अपेक्षित उत्पादन मिळाले नाही.
तर तूर पिकावर विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे पेरणीसाठी केलेला खर्च ही निघत नव्हता.
याच नैराश्येतून त्यांनी शुक्रवारी रात्री शेतात विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली,
असे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.

Web Title :-  Akola Crime | two people ended their lives in murtijapur taluka of akola in the same day

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Metro | शिवाजीनगर – हिंजवडी मेट्रो मार्गिकेच्या माहितीसाठी संकेतस्थळ विकसित

Sanjay Raut | ‘महाराष्ट्रातले देव संपले का?’; ‘मुख्यमंत्री 40 रेडयांचे बळी…’ – संजय राऊत

Vikram Gokhale Death | विक्रम गोखलेंनी दोन वेळा घेतला होता अभिनयातून संन्यास; पहिल्यावेळी संन्यास घेण्याचे ‘हे’ सांगितले होते कारण