×
HomeशहरअकोलाAkola Juvenile Correctional Institution | अकोल्याच्या बालसुधारगृहातून 7 मुली पळाल्या; 2 मुलींचा...

Akola Juvenile Correctional Institution | अकोल्याच्या बालसुधारगृहातून 7 मुली पळाल्या; 2 मुलींचा लागला शोध

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – Akola Juvenile Correctional Institution | अकोलामधील (Akola News) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरातील तुकाराम चौक परिसरात असलेल्या गायत्री बालसुधारगृहातून (Akola Juvenile Correctional Institution) 7 मुली पळून गेल्याची घटना घडली. ही बाब आज (शनिवारी) पहाटे समोर आली. याप्रकरणी खदान पोलिस ठाण्यात (Khadan Police Station) बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली. यातील 2 मुलींचा शोध लागला आहे. या बालसुधारगृहातील मुले पळून जाण्याच्या अनेक घटना घडल्या असल्याने पुन्हा सुरक्षेचा सवाल उपस्थित होत आहे.

 

अकोल्याच्या गायत्री बालसुधारगृहात (Akola Juvenile Correctional Institution) अनेक अल्पवयीन मुली आहेत. अपहरण प्रकरणातील 7 अल्पवयीन मुलींना एकाच खोलीत ठेवण्यात आले होते. तर, त्यांनी शनिवारी पहाटे 3 वाजताच्या सुमारास रुमची लोखंडी ग्रील असलेली खिडकी तोडून बाहेर उड्या घेऊन पळ काढला. पहाटे ‘योगा’ चा वेळ झाला, येथील महिला कर्मचारी त्यांना झोपेतून उठवण्यासाठी गेली. पण, रूमचा दरवाजा आतून बंद होता. अखेर बऱ्याच वेळेनंतर खोलीची खिडकी तुटल्याचे निदर्शनास आले. यानंतर खोलीचा दरवाजा तोडण्यात आला आणि मुली पळवून गेल्याचे समजले. याबाबत पोलिसात माहिती देण्यात आली.

 

पोलिसांनी 7 मुलींचा शोध घेण्यास सुरू केला असता दुपारपर्यंत यातील 2 मुलींचा शोध लागला.
दरम्यान, पळून गेलेल्या 7 मुलींपैकी 5 मुली अकोला जिल्ह्यातील तर 2 मुली बाहेरील जिल्ह्यातील असल्याचे समजते.
तर, सापडलेल्या 2 मुलींना बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर येथून ताब्यात घेण्यात आले. तसेच, पाच मुली अजूनही बेपत्ता असल्याचे समजते.

 

Web Title :- Akola Juvenile Correctional Institution | seven girls escaped from akola juvenile correctional two were searched and five are still missing

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News