महाराष्ट्राच्या सुवर्णपदक विजेत्या ‘बॉक्सर’ची आत्महत्या, 20 दिवसातील दुसरी घटना

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचा सुवर्णपदक विजेता बॉक्सर प्रणव राऊत (वय – 22) याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  प्रणव ज्या ठिकाणी दररोज सराव करत होता त्याच स्टेडियमजवळ त्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी सव्वा नऊच्या सुमारास शास्त्रीय स्टेडियम जवळील क्रिडा प्रोबोधनीत घडली. या प्रकरामुळे क्रीडा क्षेत्रात खळबळ उजाली असून शोककळा पसरली आहे. प्रणव राऊत याने आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकले नाही.

प्रणव राऊत याने महाराष्ट्राकडून खेळताना अनेक सुवर्णपदकांची कमाई केली होती. मात्र, आज त्याने अचानक हे पाऊल उचलल्यामुळे प्रशिक्षकांना मोठा धक्का बसला आहे. प्रणव सकाळी नऊच्या सुमारास शास्त्रीय स्टेडियम जवळील क्रिया प्रोबोधनी येथे गळफास लावून आत्महत्या केल्याचे समजताच क्रीडा प्रमुख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती क्रीडा प्रमुख रामदास पेठे यांनी पोलिसांना दिली. प्रणवच्या मित्रांनी आणि प्रशिक्षकांनी प्रणव आदल्या दिवशी सराव करत असल्याचे सांगितले. पोलीस त्या दृष्टीने तपास करत आहेत.

20 दिवसांतील दुसरी घटना
20 दिवसांपूर्वी ज्युनिअर महाराष्ट्र श्रीचा बहुमान जिंकलेल्या विरारच्या शरीरसौष्ठवपटूने राहत्या घरी आत्महत्या केली होती. अली सलोमानी असे या शरीरसौष्ठवपटूचे नाव असून त्याने अनेक महिने नोकरी नसल्याच्या नैराश्येतून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. नोकरी नसल्यामुळे तो अनेक दिवसांपासून नैराश्येत होता. त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

You might also like