1000 रुपयांची लाच घेताना अभियंता अ‍ँटी करप्शनच्या जाळ्यात

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन –  घरकुल (Gharkul) योजनेचे पैसे खात्यात जमा केल्याच्या बदल्यात हजार रुपयांची लाच (bribe) स्वीकारताना गृह निर्माण विभाग पंचायत समिती अकोट येथील अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचून रंगेहाथ पकडले. मंगेश सुधाकर वानखडे (वय 27) असे लाच घेणाऱ्या अभियंत्याचे नाव आहे.

अकोट तालुक्यातील जऊळखेड बु. येथील 57 वर्षीय लाभार्थ्याने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. मंगेश वानखडे हा मानधन तत्त्वावर अभियंता म्हणून कार्यरत आहे. त्याने दोन लाभार्थ्यांसाठी प्रत्येकी 500 रुपयांप्रमाणे एक हजार रुपयांची लाच मागितली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अकोट पंचायत समिती येथे सापळा रचून मंगेश वानखडेला अटक केली. अकोट पंचायत समितीअंतर्गत तक्रारदार यांचा पुतण्या व काका यांचे रमाई घरकुल योजनेचे दोन टप्प्यांचे प्रत्येकी 45 हजार रुपये खात्यात जमा केल्यावरून प्रत्येकी 500 रुपयांप्रमाणे दोघांचे एक हजार रुपये लाचेची मागणी केली. अकोट पंचायत समिती परिसरात वानखडे याला तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना अटक करण्यात आली.