Akola News : सीरम इन्स्टिट्यूटच्या आगिमध्ये अकोल्याच्या महेंद्रचा मृत्यू

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन –   पुण्यातील कोरोना लस बनविणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटला काल भीषण आग लागली होती. या आगीमध्ये पाच जणांचा मृ्त्यू झाला असून यामध्ये चार पुरुषांसह एका महिलेचा समावेश आहे. मृत पावलेल्या पैकी एक युवक अकोल्यातील चांदुर येथील असून महेंद्र प्रकाश इंगळे असे या युवकाचे नाव आहे. महेंद्रच्या अशा अकाली जाण्याने कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

महेश हा सीरममध्ये नवीन बिल्डिंगच्या मेंटन्ससाठी गेला होता. दरम्यान या बिल्डिंगला आगिमध्ये महेशचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह आज अकोल्यात येणार असून त्याच्यावर चांदुर मध्ये अंतिमसंस्कार करण्यात येणार आहे.