अकोला : आरोग्य विभागाकडून आजारांविषयी जनजागृती

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन

सध्या पावसाळ्याचे दिवस असून या दिवसांमध्ये जलजन्य व किटकजन्य आजारांना पोषक वातावरण असते. या दिवसांत योग्य काळजी घेतल्यास आजारांपासून दूर राहू शकतो तसेच आजार झाला असले तर लवकर बरे होऊ शकतो. पावसाळ्यातील रोग आणि त्यावर योग्य उपाय योजनांची माहिती अकोला जिल्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पंचगव्हाण तर्फे नेकनाम उर्दु हायस्कुल नर्सिपुर येथील विद्यार्थ्यांना दिली. तसेच डेंग्यू आजारा विषयी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
[amazon_link asins=’B01940U1SW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f76fa315-9f18-11e8-b482-5500426fcccb’]

आरोग्य विभागाने सर्व शाळांमधे जाऊन विद्यार्थ्यांना  आजारांबाबत माहिती देऊन प्रतिबंधक उपाययोजनांमधे त्यांचा सहभाग वाढवून त्यांचे व पर्यायाने सर्व समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ अंबरते यांनी विविध आजार जसे डेंग्यू, हिवाताप, चिकणगुनिया, जलजन्य आजाराचे लक्षण व उपचाराबाबत मार्गदर्शन केले.

या वेळी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी के बी ठोंबरे यांनी  विद्यार्थ्यांना डेंग्यू व मलेरिया या आजाराची प्रतिबंधात्मक उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. डासउत्पत्ती स्थान निर्माण होऊ नये यासाठी परिसरात पाणी साचू न देता ती वाहती करावी तसेच टायर, कूलर, नारळाचे करवंटी, फुलदाणी यामध्ये पाणी साठू नयेत. घरातील ड्रम, रांजण हौद, पाणी साठे व्यवस्तीत झाकून किंवा कापडाने घट्ट बांधून ठेवल्यास त्यात डास अंडी घालू शकत नसल्याचे ठोंबरे यांनी विद्यार्थी आणि उपस्थित नागरिकांना सांगितले. तसेच एक दिवस कोरडा पाळण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
[amazon_link asins=’B015KHN37E’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0245d597-9f19-11e8-b75c-01060c4cd7ce’]

व्ही टी वाघोळे यांनी हाथ धुण्याच्या पद्धत व त्याचे फायदे यावर प्रकाश टाकला. या प्रसंगी कळसकर, रावणकर तसेच मुख्याध्यापक झियाउल्ला खान सर व शिक्षकवृंदानी मोलाचं सहकार्य केले.