Akola Rape Case | धक्कादायक ! अकोल्यात 22 वर्षीय विद्यार्थिनीवर प्रशिक्षकाकडून 4 वर्षे लैंगिक अत्याचार

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – Akola Rape Case | एका बावीस वर्षीय तरुणीवर तिच्या प्रशिक्षकाने सलग 4 वर्षे लैंगिक अत्याचार (Rape) केल्याची (Coach Raped Female Student) धक्कादायक घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना अकोला येथे घडली आहे. आपली फसवणूक होत असल्याचे समजताच पीडितेने गुरुवारी (5 ऑगस्ट) रोजी रात्री उशिरा अकोल्यामधील रामदास पेठ पोलीस ठाण्यात (Ramdas Peth Police Station) याबाबत गुन्हा दाखल (Akola Rape Case) केला आहे. यावरून आरोपी प्रशिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, कोर्टाने आरोपीला 5 दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ’22 वर्षीय पीडित तरुणी मूळची शेगाव येथील रहिवासी आहे. गेल्या 4 वर्षांपासून ती सैनिक भरती प्रशिक्षणाच्या निमित्तानं अकोल्यात भाड्याने खोली घेऊन राहते. पीडित तरुणी अकोल्यामधील वसंत देसाई स्टेडियमवर पोलीस आणि सैनिक भरतीच प्रशिक्षण घेण्यासाठी जात असत. यावेळी येथील आरोपी प्रशिक्षक अमित जाधव (Accused coach Amit Jadhav) याची तिच्यावर नजर पडली. दोघंही NCC मध्ये असल्यामुळे त्या दोघात मैत्री झाली. यानंतर आरोपी अमितने प्रेम करत असल्याचा बनाव करून पीडितेवर अनेकवेळा लैंगिक अत्याचार (Rape) केलेत. तरुणी प्रेमाच्या जाळ्यात अडकल्यानंतर आरोपीने गेल्या 4 वर्षांपासून पीडितेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन लैंगिक शोषण केले आहे.

दरम्यान, आपली फसवणूक होते हे लक्षात येताच त्या पीडित तरुणीने रामदास पेठ पोलीस ठाण्यात (Ramdas Peth Police Station) धाव घेतली. तिने रामदास पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी गुरुवारी रात्री उशीरा बलात्कारासह वेगवेगळ्या गुन्ह्यांतर्गत आरोपी प्रशिक्षक अमित जाधव विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आरोपी प्रशिक्षक अमित जाधव याला अटक करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस (Police) करीत आहेत.

Web Title :- Akola Rape Case | rape on female student by coach from last 4 years in akola

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Link PAN with Aadhar | SBI चा ग्राहकांना इशारा ! ‘या’ तारखेपर्यंत आधार कार्ड पॅनशी लिंक करून घ्या, अन्यथा…

Devendra Fadnavis | ‘2024 च्या निवडणुकीत आम्ही एकाच इंजिनवर येणार’; युतीच्या चर्चेला ‘फूलस्टॉप’ (व्हिडीओ)

Pune Corporation | पुणे महापालिकेचा जायका प्रकल्प अखेर मार्गी; नदीच्या प्रवाहासह नदीकाठची जैवसाखळी अबाधित राहण्यास होणार मदत