Traffic Police | सावधान ! गाडी चालवताना सोबत कागदपत्र नसतील तर गाडी होईल जप्त

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – दुचाकी चोरीचे आणि चेन स्नॅचिंगचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अकोला वाहतूक शाखेने (Akola Traffic Police) कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. वाहन चालकाजवळ गाडीची कागदपत्रे (Documents) नसतील तर गाडी जप्त केली जात आहे. तसेच कागदपत्र जवळ न बाळगता गाडी चालवणाऱ्यावर कडक कारवाई केली जात आहे. वाहतूक पोलिसांनी (Akola Traffic Police) ही मोहीम सुरु केली आहे.

तुमच्या जवळ गाडीचे कागदपत्र सोबत नसतील, मोबाईलमध्ये DG लॉकर किंवा तत्सम अधिकृत अ‍ॅपवर स्कॅन कॉपी (Scan copy) न ठेवता वाहन चालविणाऱ्या चालकांची वाहने वाहतूक कार्यालयात जमा करुन ठेवले जात आहे. अकोला वाहतूक पोलिसांनी (Akola Traffic Police) ही मोहिम जोरात सुरु केली आहे. सहा महिन्यात पोलिसांनी तब्बल 2900 वाहनांवर कारवाई करत ती वाहने जप्त केली आहेत.

तीन चोरीच्या घटना उघडकीस
वाहनांची कागदपत्रे पडताळून नंतरच दंडात्मक कारवाई करुन सोडण्यात येत आहेत.
या मोहिमेत आता पर्यंत तीन दुचाकी चोरीची प्रकरणे उघडकीस आली असून त्यापैकी दोन अकोला शहर व एक गाडगे नगर अमरावती येथील आहेत.
आतापर्यंत 2900 दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या.
दरम्यान जप्त करण्यात आलेल्या वाहनांची पूर्ण पडताळणी करुन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

दुचाकी चोरीवर आळा बसावा आणि चेन स्नॅचिंग च्या घटनांवर आळा बसावा यासाठी पोलीस अधीक्षक जी श्रीधर (Superintendent of Police G. Sridhar) यांच्या निर्देशानुसार वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके, उपनिरीक्षक सुरेश वाघ आणि शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार ही मोहीम राबवित आहेत.

Web Titel :- Akola Traffic Police | no documents with you then your bike will be confiscated in akola

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Rohit Pawar | जामखेडच्या सतीशला मिळाले नवे आयुष्य ! आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून मिळाले मोफत उपचार

Ramdas athavle | …शरद पवार निवडून येणार नाहीत, त्यांना बळीचा बकरा करू नये

Social Media News | धोक्याची घंटा ! तुम्ही सुद्धा सोशल मीडियावर करत असाल ‘हे’ काम, तर 24 तासात डिलिट केले जाईल अकाऊंट