अकाेला : बेरोजगारांनी संधीचे सोने करुन महाराष्ट्राचा विकास करावा : मुनगंटीवार

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा हा सुशिक्षित बेरोजगारांसाठी एक मोठी संधी आहे. या माध्यमातून बेरोजगारांनी संधीचे सोने करुन स्वत:सोबतच महाराष्ट्राचा विकास करावा. तसेच अकोला जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. विशेषत: शेतकरी, बेरोजगार व महिलांच्या प्रगतीसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f439a9a7-c7f3-11e8-a1d3-1f14101f3d64′]

अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्हयातील सुशिक्षित बेराजगार उमेदवारांना नोकरीची संधी प्राप्त व्हावी या उदेशाने अकोला येथील श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिसन तोष्णीवाल महाविदयालयात कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता संचालनालय व व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या संयुक्त विदयमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उदघाटन मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठात इनक्युबेशन सेंटरसाठी ५ कोटी रुपये निधीची घोषणा यावेळी मुनगंटीवार यांनी केले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कौशल्य विकास व उदयोजकता विभागाचे राज्यमंत्री तथा अकोला जिल्हयाचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार हरिष पिंपळे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले, कौशल्य विकास व उदयोजकता विभागाचे सचिव असिमकुमार गुप्ता, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक पी.टी. देवतळे, माजी आमदार सर्वश्री डॉ. जगननाथ ढोणे, वसंतराव खोटरे, नारायण गव्हाणकर, माजी महापौर उज्वलाताई देशमुख, नगरसेवक हरिष अलीमचंदाणी, डॉ. आर.बी. हेडा, ॲड. मोतीसिंह मोहता, आशिष पवित्रकार आदीसह अशोक ओळंबे पाटील, गोपी ठाकरे आदी उपस्थित होते.
[amazon_link asins=’B01N407G2I’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f9e2a2dc-c7f3-11e8-a874-47a25fd446e6′]

भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. या तरुणांनी कौशल्य विकासाचे शिक्षण घेऊन देश घडवण्याचे कार्य करावे, असे सांगून मुनगंटीवार म्हणाले की, तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी केंद्र सरकारने अनेक योजना सुरु केल्या आहेत. स्टार्टअप इंडिया, स्टॅण्डअप इंडिया, मुद्रा योजना या सारख्या योजनांचा फायदा घेऊन तरुणांनी स्वयंपूर्ण व्हावे. आपल्या देशातच वेगवेगळया वस्तुंचे उत्पादन करुन देशाची प्रगती करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील म्हणाले की, एक सामाजिक बांधिलकी म्हणून युवकांना नोकरीची संधी मिळावी यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भविष्यातही अशाच प्रकारच्या मेळाव्यांचे आयोजन करुन युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जातील. शासन आपल्या पाठीशी आहे. आजच्या मेळाव्यात ज्या युवकांना नोकरीची संधी मिळणार नाही, त्यांनी खचून जावू नये, त्यांची आधीच नोंदणी झाली असल्यामुळे त्यांना आवश्यक प्रशिक्षण देऊन पुन्हा नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली जाईल. अकोला जिल्हयातील आदिवासी भागात बांबूचे मोठया प्रमाणात उत्पादन होते, या बांबुच्या माध्यमातून तरुणांना व्यवसायाची संधी मिळावी यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठात बांबू प्रक्रीया प्रकल्प उभारण्याची मागणी यावेळी पालकमंत्री यांनी केली.
[amazon_link asins=’B078M16N8P’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’00caac72-c7f4-11e8-9628-1f2753c9ef50′]

यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया, सचिव असिम कुमार गुप्ता यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक देवतळे यांनी केले. याप्रसंगी प्रातिनिधीक स्वरुपात काही उमेदवारांना नोकरीचे ऑफर लेटर देण्यात आले. तसेच सूवर्ण पदक विजेती खेळाडू साक्षी गायधनी हीचा गौरव करण्यात आला.

या मेळाव्याला मुंबई, पुणे, नाशिक व औरंगाबाद व इतर महत्वाच्या शहरांमधील नामांकित ३७ कंपनींचे प्रतिनीधी उपस्थित होते. एल.आर.टी. महाविदयालयासह आर.एल.टी. महाविदयालय आणि सिताबाई कला महाविदयालय येथे उमेदवारांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे ८ हजार ९६५ उमेदवारांनी मेळाव्यासाठी नावनोंदणी केली होती. साधारण १ हजार ४८९ उमेदवारांना नोकरीची संधी मिळाली. यामध्ये महत्त्वाच्या कंपन्या यशवंतराव टेक्निकल ॲण्ड ट्रेनिंग फाऊंडेशन या कंपनीने १८३ उमेदवारांची निवड केली. पायजिओ व्हेयिकल प्रा.लि. १५०, ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चर प्रा.लि. ७१,महिंद्रा व्हेईकल एमएफजी लि.चाकन पूणे १७१, व्हॅरोक ग्रुप ११०, मॅग्नम ६०, टाटा टोयॉटो ५०, भारत फोर्ज ४०, पॅलस्टिक अल्युमिनियम चाकन ३० आणि बॉश, पुणे या महत्त्वाच्या कंपन्यांनी ११२ उमेदवारांची निवड केली.
[amazon_link asins=’B00JJIDBIC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0adca563-c7f4-11e8-b1a7-c988af26a4da’]

नियोजनबध्द पध्दतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याला उपस्थित उमेदवारांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे स्वत: पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील हे सर्व उमेदवारांच्या मुलाखती संपेपर्यंत थांबले होते.

रेल्वे परीक्षा देण्यासाठी आलेल्या २०० मराठी मुलांना बाहेर काढले