अकोला : घरातच शस्त्रांचा कारखाना, पोलिसांकडून धारदार तलवारी अन् रामपूरी चाकू जप्त

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन – घरातच अवैध शस्त्र, तलवार, रामपुरी चाकू तयार करून विक्री करणा-या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून एकाला अटक केली आहे. आरोपी हा घरात मशीनद्वारे तलवार तयार करतांना आढळून आला.

अब्दुल इमराण असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस अधिक्षक यांचे विशेष पथक 15 ऑक्टोंबर रोजी रात्री रामदासपेठ परिसरातील कृषी उत्पन्न बाजारसमिती परिसरात गस्तीवर होते. त्यावेळी फिरदोस कॉलनी गवळीपूरा येथे आरोपी घरात शस्त्र तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून त्याला अटक केली. त्याच्याकडून त्याच्याकडून स्टीलच्या तीन तलवारी, लोखंडी पात्याच्या 7 तलवारी, एक लोखंडी रामपूरी चाकू, लाकडी मुठा, मोजमाची स्टील पट्टी, लोखंडी हातोडे, जंबुरा, काणस, छन्नी, पाना, असे एकूण 41 हजार410 अवैध शस्त्र बनविण्याचे उपयोगी साहित्य आढळून आले. आरोपी इमराण विरोधात रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधिक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदशर्नाखाली पोलीस निरीक्षक मिलींदकुमार बहाकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.