परिसरात पुन्हा दिसलात तर हातपाय तोडू, अकोल्यात तरुणांची पोलिसांना धमकी

पोलिसनामा ऑनलाईन – लॉकडाऊनमध्ये बाहेर फिरताना हटकल्याने तरुणांनी चक्क पोलिसांनाच धमकी दिल्याचा प्रकार अकोल्याच्या अकोट तालुक्यात घडला आहे.कोरोनाच्या संकटात कर्तव्य बजावणार्‍या पोलिसांना धमकावण्याचे प्रकार कमी होत नाहीत. परिसरात दिसल्यास परिणाम भोगायला तयार राहा, हातपाय तोडू, अशा शब्दात तरुणांनी पोलिसांना धमकी दिली.

अकोट शहर पोलीस स्टेशन हद्दीतील शौकत अली चौक परिसरात पेट्रोलिंग करणार्‍या दोन पोलिसांसोबत काल (29 मे) रात्री हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, या प्रकरणात अद्यापही कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. तर पोलीस दारु पिऊन आल्याचा आरोप तरुणांनी केला आहे. यासंदर्भात पोलिसांना विचारणा केली असता त्यांनी दारु पिण्याचा प्रकारा घडला नसल्याचे सांगण्यात आले. यापूर्वीही अशी घडला घडली होती, तेव्हा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कर्मचार्‍याला निलंबित केले होते. तेव्हापासून अकोल्यात पोलिसांवरील हल्ल्याचे, त्यांना धमकी देण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. हे तरुण बाहेर फिरताना पोलिसांनी हटकल्याने त्यांनी धमकी देण्यास सुरुवात केली. यानंतर जवळपास 400 जणांचा जमाव इथे जमल्याने पोलिसांना काढता पाय घ्यावा लागला.