ईव्हिएमला विरोध ; मतदारानं मशीनच फोडलं

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन – ईव्हीएम मशीनला विरोध असल्याचा दावा करत अकोला जिल्ह्यातील मतदान केंद्रावर एका मतदाराने ईव्हीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकऱणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

श्रीकृष्ण घ्यारे असं तरुणाचे नाव असून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. राज्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु झालं आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातील बाळापूर येथील कवठा गावातील मतदान केंद्रावर श्रीकृष्ण घ्यारे हा मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आला.

त्याने मतदान कक्षाजवळ पोहोताच ईव्हीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. तर मतदान केंद्रावर नवीन मशीन पाठविण्यात आलं आहे. या मतदान केंद्रावरील मतदान सुरळीत सुरु असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान श्रीकृष्णचा ईव्हीएमला विरोध असल्याने त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

You might also like