महाराष्ट्राच्या ‘या’ जिल्ह्यात मोदीं विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यवार आदर्श आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असा तक्रार अर्ज अकोल्यातील काही विधिज्ञांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारीही सुरु केली आहे. विशेष म्हणजे, देशात पहिल्या टप्प्यातील मतदानही पूर्ण झालेले आहे, यादरम्यान लातुर जिल्ह्यातील औसा येथे ९ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा घटनेतील शहिदांचा तसेच एअर स्ट्राईकमध्ये सहभागी जवानांच्या नावावर मते मागीतली. सैन्याच्या नावावर राजकारण करण्याचा हा प्रकार असून यामुळे पंतप्रधानांवर आदर्श आचारसंहितेचा भंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असा तक्रार अर्ज अकोल्यातील काही विधिज्ञांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.

इतकेच नव्हे तर, पंतप्रधान मोदीनी औसा येथिल सभेत मतदारांना त्याचे मतदान पुलवामा घटनेतील शहिदांना समर्पित होऊ शकते का? तुमचे मतदान वालाकोट येथे एअर स्ट्राईक मध्ये सहभागी सैनिकांसाठी समर्पित होऊ शकते का? भारतीया सैनिकांच्या व शहिद जवानांच्या नावाचा वापर करून राजकारण करण्याच्या या प्रकारामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाला आहे त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्यावर प्रचार करण्यास कायमस्वरूपी बंदी घालावी. असेही त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

याचबरोबर, यु-टयुब या सोशल मीडीयावर भाजपा या चॅनलच्या माध्यमातून थीम साँग मध्येही सैनाच्या कारवाईचे फोटो तसेच फोटोंचा वापर केला आहे. एक प्रकारे हासुद्धा आचारसंहितेचा भंग आहे. त्यामुळे यु टयुब वरील भाजपाच्या या चॅनलवरही बंदी घालावी असेही त्यांनी म्हंटले.