‘प्रायव्हेट रोमँस’नंतर आता अक्षरा सिंहचं ‘होली के पुआ’ भोजपुरी व्हिडीओ व्हायरल !

पोलीसनामा ऑनलाइन – भोजपुरी सेंसेशन अक्षरा सिंहचं होळी साँग सध्या खूप पॉप्युलर होताना दिसत आहे. अक्षराचं होळी स्पेशल व्हिडीओ होली के पुआ रिलीज झालं आहे. खास बात अशी की, या होळी साँगला खुद्द अक्षरा सिंहनं आवाज दिला आहे. इतकेच नाही तर या गाण्याच्या म्युझिक व्हिडीओत तिनं अॅक्टींगदेखील केली आहे. लोकगीताच्या रूपातील अक्षरा सिंहचं हे गाणं सध्या चर्चेत आलं आहे.

व्हिडीओबद्दल बोलताना अक्षरा सिंह म्हणाली, “होली के पुआ या गाण्याची थीम पती-पत्नी यांच्यातील संवादावर आधारीत आहे. होळीत पुआ या पक्वांनाचं खूप महत्त्व आहे. होळीच्या दिवशी सर्व घरात पुआ बनवलं जातं. त्यामुळं आम्ही आमच्या गाण्यात सांकेतिक रुपात पुआचा वापर केला आहे. युपी बिहारच्या होळीत लोकसंगीताचं खूप महत्त्व आहे. त्यामुळं यावेळी मी लोकगीत घेऊन आले आहे. आशा करते लोकांना हे माझं लोकांना खूप आवडेल आणि ते या गाण्यालाही तितकंच प्रेम देतील.”

याधीही अक्षरानं प्रायवेट रोमँस हे गाणं रिलीज केलं होतं. हे गाणं वेस्टर्न संगीतावर आधारीत होतं. भोजपुरी प्रेक्षकांना हे गाणं खूप आवडलं होतं. यानंतर आता ती एक लोकगीत घेऊन आली आहे. रिलीजनंतर हे गाणंही मोठ्या प्रमाणात पाहिलं जाताना दिसत आहे. अक्षरा सिंहनं तिचा युट्युब चॅनल अक्षरा सिंहवरून रिलीज केलं आहे. या गाण्याचे लिरीक्स आर आर पंकजनं लिहिले आहेत. एजे अजयनं या गाण्याला म्युझिक दिलं आहे.