‘त्याची’ इच्छा होती की, तिसऱ्या लग्नानंतरही मी त्याच्यासोबत राहावं : अभिनेत्रीचे अभिनेत्याबाबत मोठे ‘खुलासे’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भोजपुरी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री अक्षरा सिंह गेल्या 9 वर्षांपासून इंडस्ट्रीत सक्रिय आहे. आपला कोस्टार पवन सिंह सोबत तिनेच फक्त सिनेमेच नाही केले तर दोघे लाँग टाईम रिलेशनशिपमध्ये होते. वर्षभरापूर्वी पवन सिंहने तिसरे लग्न केले. यानंतर तिने त्याच्यासोबत रिलेशन तोडले. एवढंच काय तर तिने याबद्दल एफआयआर दाखल करण्यापर्यंतही उमेश कुमार उपाध्यायसोबत चर्चो केली. एका मुलाखतीत तिने अनेक खुलासे केले आहेत.

पवन सिंहचं आणि अक्षराचं कसं बिघडलं ?

नात्यात दरी कशी आली हे सांगताना अक्षरा म्हणाली की, “गेल्या वर्षभरापासून आम्ही सोबत काम करत नाहीत. एकेकाळी आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. वर्षभरापूर्वीच त्याचं लग्न झालं. यानंतर सोबत राहणं मला मंजूर नव्हतं. परंतु त्याची वर्तणूक अशी होती की, एखादी अ‍ॅक्ट्रेस सोडून जाईल कशी ? सर्व्हाइव कशी करेल ? माझ्या पायांवरच पडणार. पंरतु हे सगळं मला पटत नव्हतं. यानंतर तो मला इंडस्ट्रीतून आऊट करण्यासाठी प्रयत्न करू लागला. मला सिनेमातून हटवू लागला. प्रत्येक ठिकाणी माझ्याविषयी निगेटीव बोलू लागला. याबाबत मी मीडियाशी बोलले तेव्हा मला मारण्याची धमकी दिली गेली. मला बोलला की, एखाद्या न्यूड फोटोवर तुझा चेहरा लावून व्हायरल करेल. मला हे सगळं सहन नव्हतं होतं. अखेर मी तक्रार दाखल केली.”

‘तीन लग्न होऊनही मुलींना छळतो’

पवन सिंह थेट प्रत्यक्ष हे सगळं बोलला का ? असं विचारल्यानंतर अक्षरा म्हणाली की, “हाच तर प्रॉब्लेम होता की, तो हे सगळं स्वत: बोलत नव्हता. हे सगळं तो इंटरनली आपल्या चुलत भावांकडून करवून घेत होता. यांच्या अनेक हरकती अशाच होत्या ज्या सर्वांना माहिती होत्या. त्याच्या दुसऱ्या बायकोनेही सुसाईड केलं आहे. तीन लग्न झाले आहेत तरीही मुलींना छळतो.”

‘मी त्या मुलींसाठी लढणार आहे ज्या…’

जेव्हा अक्षराला विचारण्यात आलं की, तिने जो स्टँड घेतला आहे त्याला ती कुठवर नेणार आहे ? त्यावर ती म्हणाली की, “पवन भाजपचा स्टार प्रचारक आहे. भाजपचं अभियान आहे की बेटी बचाओ बेटी पढाओ. मग असा माणूस जो मुलींसोबत बरंच काही करतो, त्यांना छळतो अशा माणसाला भाजप का प्रमोट करत आहे. माझी इच्छा आहे की, याच्याविरोधात अ‍ॅक्शन घेतली जावी. ज्या मुलींसाठी मी प्रेरणा आहे त्या मुलींसाठी मी लढणार आहे. ज्या सामान्य मुली आहेत की, इज्जतीला घाबरून जीव देतात आणि काहींना तर गायबच केलं जातं लोकांना तर हे कळतही नाही त्या मुलींसाठी मी लढणार आहे.”

आरोग्यविषयक वृत्त