नारायण मूर्तीची कन्या अक्षता मूर्ती ही ब्रिटनच्या महाराणी एलिजाबेथपेक्षाही श्रीमंत, 4300 कोटीची आहे मालकीण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंफोसिसचे कंपनीचे संस्थापक नारायण मुर्ती (Narayan Murthy) यांचे जावई आणि ब्रिटनचे वित्तमंत्री ऋषि सुनक हे संपत्तीची पूर्ण माहिती न दिल्यामुळे वाद्याच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यांच्यावर मालमत्तेसंबंधी माहिती लपवल्याचा आरोप लावण्यात आला आहे. दरम्यान मुर्ती यांची कन्या अक्षता (Akshata Murthy) हिची इंफोसिसमध्ये 0.91 टक्के भागीदारी आहे. विशेष म्हणजे ऋषि सुनक यांनी सरकारी कागदपत्रांमध्ये आपल्या पत्नीच्या संपत्तीचा उल्लेख केलेला नाही. अक्षता मुर्ती यांच्या संपत्तीचा खुलासा केल्यानंतर आता ब्रिटनच्या सगळ्यात श्रीमंत महिलांमध्ये त्यांचा समावेश झाला आहे. अक्षता यांची संपत्ती ब्रिटनची राणी एलिजाबेथ यांच्यापेक्षाही जास्त आहे. संडे टाइम्सने दिल्या माहितीनुसार ब्रिटनची महाराणी एलिजाबेथ यांची संपत्ती एकूण 3500 कोटी इतकी होती. अक्षता यांची संपत्ती 4300 कोटी इतकी आहे.

संपत्ती जाहिर करणे अनिवार्य
गेल्या काही महिन्यांपासून ऋषि सुनक (Rishi Sunak) यांच्याकडे संपत्तीबात खुलासा करण्याची मागणी करण्यात आली होती. सुनक यांनी आपल्या संपत्तीबाबत माहिती दिली असून आपल्या पत्नीच्या संपत्तीबाबत माहिती दिली नव्हती. यावरून प्रश्न उपस्थित केले जात होते. दरम्यान ब्रिटनमध्ये प्रत्येक मंत्र्याला आपली संपत्ती घोषित करणे अनिवार्य आहे. ब्रिटिश वित्त मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सुनक यांनी मिनिस्टरियल कोडचे उल्लंघन केले आहे.

2009 मध्ये विवाहबध्द
ऋषि सुनक यांची संपत्ती जवळपास 2000 कोटी इतकी आहे. यामुळेच ब्रिटनच्या सगळ्यात श्रीमंत खासदारांमध्ये त्यांचा समावेश आहे. अक्षता मुर्ती आणि ऋषी सुनक यांचे लग्न २००९ मध्ये झाले. या दोघांची भेट स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत असताना झाली होती. त्यानंतर या दोघांच्याही मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. ऋषि सुनक यांचे आई वडील 60 व्या दशकात पूर्व आफ्रिकेतून ब्रिटनमध्ये शिफ्ट झाले आहेत.