Akshay Kumar | अखेर अक्षय कुमारने कॅनडाचे नागरिकत्व नाकारले; ‘या’ देशाच्या नागरिकत्वासाठी केला अर्ज

पोलीसनामा ऑनलाइन : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता. त्यांनी त्याच्या चाहत्याला मिठी मारल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होते. तर आता त्याचा ‘सेल्फी’ या चित्रपटामुळे तो चर्चेत होता. अक्षय नेहमीच चाहत्यांची मने जिंकत असतो. अक्षय त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या ठाम भूमिकेमुळे देखील ओळखला जातो. आता अक्षयने (Akshay Kumar) असे काही केले आहे ज्यामुळे पुन्हा एकदा त्यांनी भारतीयांची मने जिंकली आहेत.

अक्षयने आता कॅनडाचा पासपोर्ट नाकारला असून भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी त्यांनी अर्ज केला आहे. अक्षय जरी गेल्या 30 वर्षापासून बॉलीवूडमध्ये काम करत असला तरी तो भारतीय नागरिक नव्हता. भारताविषयी त्याला खूप आदर आणि प्रेम होते. हे नेहमीच तो आपल्या भूमिकेतून आपल्या वक्तव्यातून स्पष्ट करत असतो. तर आता अक्षयने कॅनडाचा पासपोर्ट त्याग करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याची माहिती अक्षयने (Akshay Kumar) दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

अक्षय म्हणाला की, “माझ्यासाठी भारत म्हणजेच सर्व काही आहे. मी भारताच्या पासपोर्टसाठी अर्ज केला आहे.
मी कॅनडाचे नागरिकत्व का घेतले याविषयी कोणालाही माहिती नसताना मला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला गेला.
याचे मला वाईट वाटले आहे. भारत माझ्यासाठी सर्व काही आहे. कारण भारताकडूनच मला सर्व काही मिळाले आहे.
मी आज जे आहे ते केवळ भारतामुळेच आहे.
हे माझे भाग्य आहे की पुन्हा एकदा मला भारताचा नागरिक होण्याची संधी मिळणार आहे.
तर अनेकदा अक्षयला त्याच्या कॅनडाच्या नागरिकत्वामुळे ट्रॉलिंगचा सामना करावा लागला.
अनेक राजकीय नेत्यांनीही त्याला त्याच्या कॅनडाच्या नागरिकत्ववरून टीका देखील केली होती.

Web Title :- Akshay Kumar | akshay kumar says india is everything to him and he has already applied for a change of passport

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Akola Crime News | धक्कादायक ! सैन्य दलात असलेल्या पतीने पत्नीचा गळा चिरला; नंतर स्वतःच सासूला फोन करुन दिली माहिती

Police Committed Suicide in Mumbai | मुंबई पोलीस दलात खळबळ! भायखळा कारागृहाबाहेर तैनात पोलिसाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

Pune Accident News | भरधाव वेगातील कार पलटून भीषण अपघात; 3 ठार तर 1 जखमी