‘ सूर्यवंशी ’ चित्रपटात अक्षयसोबत झळकणार ‘ ही ’अभिनेत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रोहित शेट्टीने दिग्दर्शित केलेल्या ‘सिम्बा’या चित्रपटाने चांगलाच धुमाकूळ घातला . चाहत्यांनी हा चित्रपट चांगलाच डोक्यावर घेतला होता . याच चित्रपटात शेवटी रोहित शेट्टीने त्याच्या आगामी चित्रपट ‘सूर्यवंशी’चे नाव जाहीर केले होते .  इतकेच नाही तर ,  अक्षय कुमार हा या चित्रपटात मु्ख्य भूमिकेत झळकणार आहे असेही सांगतिले होते . या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत . चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी चांगलीच उत्सुकता असल्याचे दिसत आहे.

गेल्या महिन्यात ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचे दोन पोस्टर रिलीज झाले होते . या चित्रपटात अक्षय कुमारसोबत कोणती अभिनेत्री असणार हे मात्र गुलदस्त्यात होते .  त्यामुळे त्याची सर्वत्र चर्चाही सुरू होती . याआधी अभिनेत्री कतरिना कैफ आणि पुजा हेगडे या दोन नावाची चर्चा ‘सूर्यवंशी’ साठी होती . परंतु आता या चित्रपटात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस झळकणार असल्याचं समजत आहे. अक्षय कुमार आणि जॅकलिन फर्नांडिस ही जोडी या आधीही ‘हाउसफुल’ चित्रपटात एकत्र पहायला मिळाली होती.

दरम्यान ‘सूर्यवंशी’ चित्रपटात अजय देवगनचा ‘सिंघम’ आणि रणवीर सिंगच्या ‘सिम्बा’ चित्रपटाची झलक पहायला मिळणार आहे असेही समजत आहे .  अक्षय कुमार त्याचा आगामी चित्रपट ‘ केसरी ’ मध्ये सध्या व्यग्र आहे . मुख्य म्हणजे या चित्रपटात अक्षय कुमारसोबत परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत असणार आहे असेही समजत आहे.