‘खिलाडी’ अक्षयची तब्बल 100 कोटींची डील, केवळ 45 दिवस करणार शूटींग अन् मिळणार दरदिवशी 2 कोटी

पोलिसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळख असलेला अक्षय कुमार (Bollywood actor, Akshay Kumar) सर्वाधिक बिझी अभिनेता आहे. यापुढे कदाचित सर्वाधिक महागडा अभिनेता म्हणून ओखळला जाईल, असेच काहीसे अक्षयबद्दल म्हणावे लागणार आहे. कारण आगामी एका चित्रपटासाठी अक्षयने तब्बल 100 कोटी रुपये मानधन (akshay-kumar-be-paid-rs-100-crore-comedy-movie) घेतले आहे.

अक्षयने दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांचा एक कॉमेडी सिनेमा साईन केल्याची खबर अलीकडेच आली होती. हा सिनेमा जॅकी व वासू भगनानी प्रोड्यूस करत आहेत. या सिनेमासाठी अक्कीला तब्बल 100 कोटी फी देण्यात आल्याचे समजतेय.

बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘बेल बॉटम’ या सिनेमाचे शूटिंग सुरू असतानाच अक्षयने या कॉमेडी सिनेमासाठी होकार दिला होता. या आगामी सिनेमाचा प्रॉडक्शन बजेट 35 ते 40 कोटी रुपये आहे. मात्र, एकूण बजेट 150 कोटी रुपयांवर गेले आहे. कारण केवळ अक्षय कुमारलाच मानधनापोटी 100 कोटी फी दिली जाणार आहे. हा सिनेमा अक्षय केवळ 45 दिवसांत पूर्ण करणार आहे. यामुळे चित्रपटात संभाव्य तोट्याची शक्यता कमी आहे. तसेही सॅटेलाईट, डिजिटल आणि म्युझिक राईट्स विकून चित्रपटावर लागलेले अर्धे पैसे वसूल होतील. बाकीचे अर्धे पैसे थिएटरमधून निघतील. या सिनेमाचे शूटिंग पुढील वर्षी जुलैच्या जवळपास सुरू होईल आणि ऑगस्टच्या अखेरपर्यंत सिनेमा बनून तयार होईल.

मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, मुदस्सर अजीजच्या चित्रपटासोबत अक्षय कुमारला एक सोशल ड्रामा आणि अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटाचीदेखील ऑपर दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अक्षय कुमारकडे जवळपास एकूण 10 चित्रपट आहेत. ज्यांचे शूटिंग 2021 पर्यंत पूर्ण होईल. काही दिवसांपूर्वीच अक्षयने रंजीत तिवारीचा स्पाई थ्रिलर ‘बेल बॉटम’चे शूटिंग केले आहे आणि सध्या तो यशराज बॅनरचा चित्रपट ‘पृथ्वीराज’मध्ये व्यस्त आहे. ‘पृथ्वीराज; चित्रपटानंतर अक्षय कुमार दिग्दर्शक आनंद एल रायचा ‘अतरंगी रे; चे शूटिंग करणार आहे. त्यानंतर साजिद नाडियादवाला बॅनरखाली निर्मिती होणा-या ‘बच्चन पांडे’च्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटांची यादी इथे संपत नाही, ‘बच्चन पांडे’ नंतर तो एकता कपूर निर्मित एका अ‍ॅक्शन कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे.